शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

प्रकल्पग्रस्तांना सात कोटी ३० लाखांचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 4:32 AM

गारगोटी, भुदरगड तालुक्यातील पडखंबे येथे दहा वर्षांपूर्वी ल. पा. प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. परंतु प्रकल्पातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई ...

गारगोटी,

भुदरगड तालुक्यातील पडखंबे येथे दहा वर्षांपूर्वी ल. पा. प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. परंतु प्रकल्पातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न मिळाल्याने तो निधी प्रलंबित राहिला होता; पण आमदार प्रकाश आबिटकर यांनी पाठपुरावा करून राज्य शासनाकडून खास बाब म्हणून ७ कोटी ३० रुपयांचा निधी मंजूर करून आणला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.

पडखंबे ल. पा. तलाव हा सुमारे गेल्या १० ते १५ वर्षांपासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी बुडीत होण्याच्या भरपाईसाठी प्रलंबित होता. हा प्रकल्प २०१३ मध्ये रद्द करण्याची शिफारस जलसंधारण महामंडळाकडे करण्यात आली होती. परंतु आमदार प्रकाश आबिटकर यांनी २०१४ मध्ये पडखंबेसह प्रंचक्रोशीसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या या प्रकल्पास रद्द ‘न’ करता सुधारित प्रशासकीय मान्यता‍ मिळावी, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून तत्कालीन जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे वेळोवेळी घेतलेल्या बैठका व केलेल्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पास १४ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. परंतु प्रकल्पाचे काम सुरू करण्यामध्ये प्रमुख अडसर असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या बाधित होणाऱ्या जमिनींकरिता मोबदला मिळणे गरजेचे आवश्यक होते. याबाबत नुकसानभरपाईसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. यानुसार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्रतील आमदारांच्या झालेल्या बैठकीमध्ये आमदार आबिटकर यांनी पडखंबे प्रकल्पातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली होती. या मागणीनुसार मुख्यमंत्री ठाकरे यांनी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांना निर्देश दिले. यानुसार जलसंधारण मंत्री गडाख यांनी शेतकऱ्यांना जमिनींच्या नुकसानभरपाईपोटी ७ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या या धरणास खऱ्याअर्थाने गती मिळाली आहे. पडखंबेसह न्हाव्याचीवाडी, वरपेवाडी, शेळोली परिसरातील शेकडो एकर जमिनी ओलिताखाली येणार आहेत.