कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरामध्ये लसीअभावी केवळ ७ हजार ८१० नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. यामध्ये ३ हजार ८४० जणांनी पहिला, तर ३ हजार ९७९ जणांनी दुसरा डोस घेतला आहे; मात्र बुधवारसाठी ७० हजार डोस उपलब्ध होणार असल्याने बुधवारी आणि गुरुवारी लसीकरणाला वेग येणार आहे.
जिल्ह्यातील २३८ पैकी केवळ १२९ केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. मंगळवारी सरासरी दैनंदिन लागणारी लस उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील लसीकरणाची संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यात सरासरी एप्रिलच्या सुरुवातीला ३५ हजार डोस दिले जात होते; परंतु डोस कमी उपलब्ध होत असल्यामुळे जिल्ह्यात मंगळवारी १०९ केंद्रांवर लसीकरण झाले नाही. काही ठिकाणी लस संपल्याचे फलक लावण्यात आले होते.