शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

कोल्हापुरी गुळाचा ‘गोडवा’ वाढणार आवकेत ७१ हजार रव्यांची वाढ; दरही तेजीत राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2018 12:00 AM

उसाचे घटलेले उत्पादन आणि वाढलेल्या एफआरपीमुळे यंदा गुळाचा ‘गोडवा’ वाढणार हे निश्चित आहे. सध्या हंगामाने गती घेतली नसली, तरी सरासरी प्रतिक्विंटल ३७५० रुपये दर आहे.

ठळक मुद्देआगामी दोन-तीन महिन्यांत यामध्ये किमान दोनशे रुपयांची वाढ होईलगेल्या वर्षी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत २२ लाख गूळ रव्यांची आवक झाली होती

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : उसाचे घटलेले उत्पादन आणि वाढलेल्या एफआरपीमुळे यंदा गुळाचा ‘गोडवा’ वाढणार हे निश्चित आहे. सध्या हंगामाने गती घेतली नसली, तरी सरासरी प्रतिक्विंटल ३७५० रुपये दर आहे. गुजरात बाजारपेठेचा अंदाज घेता आगामी दोन-तीन महिन्यांत यामध्ये किमान दोनशे रुपयांची वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

‘कोल्हापुरी गूळ’ हा कोल्हापूरच्या ओळखीतील प्रमुख आहे. चव व कणीदार गुळाने साऱ्या जगाला भुरळ घातली आहे. येथील जमिनीतच कसदारपणा असल्याने गुळाला वेगळीच चव येते. जिल्'ात दीड हजार गुºहाळघरे होती, पण अनिश्चित दर, साखर कारखान्यांची वाढलेली संख्या आणि उसाच्या वाढत गेलेल्या दरामुळे शेतकरी गूळ निर्मितीपासून थोडे दूर जाऊ लागले आहेत.

गेल्या वर्षी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत २२ लाख गूळ रव्यांची आवक झाली होती. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत २ लाख ८६ हजार ७२ रव्यांची आवक झाली होती. त्यावेळी सरासरी प्रतिक्विंटल ३६०० रुपये दर राहिला होता. यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच ३ लाख ५७ हजार रव्यांची आवक झाली.

यामध्ये पावसाळ्यात कर्नाटकातील गुळाची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यात घटस्थापनेच्या अगोदरपासून गुºहाळे सुरू आहेत; त्यामुळे आवकेत वाढ झाली आहे. यंदा आवक वाढली असली, तरी दरही चांगला मिळत आहे. चांगल्या प्रतीच्या गुळाला साडेचार हजार रुपयांपर्यंत दर आहे. यंदा साखरेचा किमान दर २९ रुपये केला, उसाचे उत्पादन कमी असल्याने त्याचा परिणाम गूळ दरावर होणार आहे. गुजरात बाजारपेठेचा अंदाज घेता, यंदा दोनशे रुपये जादा दर मिळण्याची शक्यता आहे.‘अवकाळी’चा अडथळा कमीगतवर्षीच्या तुलनेत आॅक्टोबरपासून परतीचा व अवकाळी पाऊस यंदा कमी आहे. दोन-तीन दिवसांचा अपवाद वगळता पाऊस झालाच नसल्याने गुºहाळ घरांना अडथळा आला नाही. याचा परिणामही आवक वाढण्यात झाला आहे.

तरच ऊस गुºहाळघराकडेसाधारणत: कोल्हापुरातील उसाचे वाण पाहता दोन टन उसाचे गाळप केल्यानंतर २६० किलो गूळ तयार होतो. आताचा सरासरी ३६०० रुपये दर कायम राहिला तर या गुळाचे ९३६० रुपये होतात. त्यातून गुळाचा उत्पादन खर्च २५०० रुपये वजा जाता ६८६० रुपये (दोन टन ऊस गाळप करून) शिल्लक राहतात. यंदा कारखान्यांची सरासरी २९०० रुपये एफआरपी आहे; त्यामुळे गुळाचा दर ३६०० रुपये कायम राहिला तरच शेतकरी गुºहाळघराकडे वळणार आहे. 

यंदा उसाचे उत्पादन कमी आणि कारखान्यांच्या वाढलेल्या एफआरपीमुळे गुळाचा दर चांगला राहील. गुळाची आवक कमी झाली, तरी सरासरी दरात वाढ राहू शकते. - मोहन सालपे(सचिव, बाजार समिती)कोल्हापुरी गुळाला नेहमीच मागणी चांगली राहते. साखरेच्या दराचा परिणाम गूळ दरावर होतो, त्यामुळे यंदा मार्केट चांगले राहील असे वाटते.- बाळासाहेब मनाडे (गूळ व्यापारी)

टॅग्स :Baazaarबाजारbusinessव्यवसाय