कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात २३६.७९ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणामधून ७११२ तर अलमट्टी धरणातून १५९०००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प व जंगमहट्टी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- शिरगाव, राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे व तारळे, वारणा नदीवरील-चिंचोली, माणगाव, कोडोली, खोची, तांदूळवाडी, मांगलेसावर्डे, शिगाव व चावरे कुंभी नदीवरील- शेणवडे, मांडुकली, सांगशी, असळज, सांगरूळ, कळे, कातळी व वेतवडे, धामणी नदीवरील- सुळे, अंबर्डे, पनोरे, गवशी, म्हासुर्ली व शेळोशी, कासारी नदीवरील- कुंभेवाडी, कांटे, करंजफेण, पेंडाखळे, बाजारभोगाव, वालोली, पुनाळ तिरपण, ठाणे आवळे व यवलुज, वेदगंगा नदीवरील-निळपण, वाघापूर, शेणगाव, गारगोटी, म्हसवे, कुरणी, सुरूपली, बस्तवडे व चिखली, दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, बाचणी, सुळकूड, दत्तवाड, सुळंबी, कसबा वाळवे व तुरंबे, हिरण्यकेशी नदीवरील-साळगाव, ऐनापूर, गिजवणे, निलजी, हरळी, खणदाळ, देवर्डे, चांदेवाडी, हाजगोळी, भादवण, गजरगांव व जरळी, ताम्रपर्णी नदीवरील-कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, कोवाड, माणगाव, कोकरे, न्हावेली, उमगाव व कामेवाडी, घटप्रभा नदीवरील-पिळणी, बिजुरभोगोली, हिंडगांव गवसे, कानडे सावर्डे, अडकूर, तारेवाडी व कानडेवाडी, तुळशी नदीवरील- बाचणी, आरे व बीड, कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगांव, सरूडपाटणे, बालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे असे एकूण ९८ बंधारे पाण्याखाली आहेत.
नजिकच्या कोयना धरणात ६७.११ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ९७.२७७ इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 72.42 दलघमी, वारणा 822.65 दलघमी, दूधगंगा 596.12 दलघमी, कासारी 69.91 दलघमी, कडवी 56.79 दलघमी, कुंभी 63.14 दलघमी, पाटगाव 92.14 दलघमी, चिकोत्रा 26.73 दलघमी, चित्री 42.74 दलघमी, जंगमहट्टी 34.65 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, कोदे (ल पा) 6.06 दलघमी असा आहे.
तसेच बंधाऱ्यातील पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 44.7 फूट, सुर्वे 40.8 फूट, रुई 70 फूट, इचलकरंजी 64 फूट, तेरवाड 56.6 फूट, शिरोळ 52.9 फूट, नृसिंहवाडी 51 फूट, राजापूर 40.6 फूट तर नजीकच्या सांगली 23.9 फूट व अंकली 29.6 फूट अशी आहे.