शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

कोल्हापूर जिल्ह्यातील ७६ गावांना भुस्खलनाचा धोका, स्थलांतर होण्याच्या सूचना देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 4:23 PM

कायमस्वरुपी स्थलांतर गरजेचे

कोल्हापूर : दरड कोसळणे, भुस्खलन, जमीन खचणे, रस्ता खचणे, अशा वेगवेगळ्या कारणाने जिल्ह्यातील ७६ गावे भीतीच्या छायेखाली आहेत. या गावांची यादी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने तयार केली असून यातील काही गावे ही लोकवस्तीची असून मुसळधार पाऊस सुरू झाला की तेथील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या जातात.पावसाळा सुरू झाला की पुराच्या धोक्यामुुळे कोल्हापूर जिल्हा नेहमीच हायअलर्टवर असतो. याकाळात अतिवृष्टी होत असलेल्या ठिकाणी दरडी कोसळणे, भुस्खलन होणे, जमीन खचणे किंवा रस्ता खचणे असे प्रकार होतात. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागात याचे प्रमाण जास्त आहे.

सन २०२१ दरड कोसळून राधानगरीतील दाम्पत्याचा मृत्यू झाला होता. तसेच करवीरमधील शिपेकरवाडी येथेही अशी घटना घडली होती. अतिवृष्टी सुरू झाली की जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून सुरक्षिततेचा उपाय म्हणून या लोकांचे स्थलांतर केले जाते. यात जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन ग्रामपंचायतींच्या वतीने जनजागृती केली आहे.

जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणे / गावेशाहुवाडी : घोलसवडे, पणुरे, कासार्डे. कांडवणपैकी आगलावेवाडी, माणपैकी ठाणेवाडी, गेळवडे, पुसर्ले, लोलाणे, करंजफेण, मारळे, सावर्डे, शिराळा मलकापूर, विशाळगड भोसलेवाडी, शित्तूर वरुण, कडवेपैकी शिंदेवाडी, उखळू, पणुद्रेपैकी हिंगणेवाडी, भेडवडे, उखळूपैकी अंबाईवाडीपैकी खोतवाडी, शिराळा मलकापूर धनगरवाडा.पन्हाळा : बडेवाडी डोंगर, पोहाळवाडी दरड, गिरोली जोतिबा दरड, पावनगड दरड, मंगळवार पेटते पन्हाळा दरड, बुधवार पेठ परिसर मुख्य रस्ता, मौजे मराठवाडी, म्हाळूंगे ॲडव्हेंचर पार्क, आपटी.करवीर : महे, बोलोली, शिपेकरवाड एरिया, आमशी सातेरी, खुपिरे.भुदरगड : मौेजे डेलेपैकी भारमलवाडी, फये, भेंडेवेडी, बीजवडे, पडखांबेपैकी खोतवाडी, पडखांबेपैकी रावणवाडी, वासनोलीपैकी धनगरवाडा, वासनोलीपैकी जोगेवाडी, कालवडेपैकी हारफोडेवाडी, टिक्केवाडी, मंदापूरगडहिंग्लज : चिंचेवाडी, सामानगड.राधानगरी : कोणाली तर्फ असंडोली, पाटपन्हाळादरड, गैैबीघाट, शिरगाव, सावतवाडी, मानेवाडी, खामकरवाडी, गोटेवाडी, केळोशी बुद्रूक, केळोशी खुर्द, पाल खुर्द, तळगाव, पडसाळी, राई, माणबेट, चौके, राऊतवाडी, पणोरी, कासारपुतळे, पाल बुद्रूक पैकी मोहितेवाडी, आपटाळ, चोरवाडी, कुराडवाडी, ऐनीपैकी धमालेवाडी, ऐनीपैकी भैरी धनगरवाडा, कासारवाडापैकी धनगरवाडा, धामणवाडीपैकी हणबरवाडी, धामणवाडीपैकी अवचितवाडी, पांडेवाडी, सोळांकूर रामनगर.कागल : बोळावी ठाणेवाडी, बेलेवाडी मासा, चिकोत्रा खोरे हासूर बुद्रूक, रांगोळी.आजरा : वाजरे, खोतवाडी, पेरणोली, हारपेवाडीचंदगड : गंधारगडगगनबावडा : अणदूर रोड, कडवे रोड, मांडुकली, शेळोशी रोड.

कायमस्वरुपी स्थलांतर गरजेचेजिल्ह्यातील या ७६ गावांमधील धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे कायमस्वरुपी स्थलांतर होणे गरजेचे आहे. याठिकाणी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम बसवण्याचा विचार झाला होता, पण अजून त्यावर कार्यवाही झालेली नाही.

जिल्ह्यातील ७६ ठिकाणे धोकादायक असली तरी त्यातील मानवी वस्ती असलेली मोजकीच गावे आहे. अतिवृष्टी सुरू झाली की परिस्थिती बघून तेथील नागरिकांना जवळचे सभागृह, समाज मंदिर, शाळांमध्ये स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या जातात. - प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlandslidesभूस्खलनRainपाऊस