कोल्हापूर : वीज बिलांच्या वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर बनली आहे, त्यात कोल्हापूर मंडळातील इचलकरंजी विभागात ७७ कोटी ४७ लाख रुपयांची वीज बिल थकबाकी आहे.
कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अंकुर कावळे यांनी इचलकरंजी विभागाची बैठक घेतली. वीजबिलाची वसुली ठप्प झाल्याने ह्यमहावितरणह्णचा दैनंदिन खर्च भागविणे कठीण झाले आहे तेव्हा वीजबिलाची वसुली प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश कावळे यांनी संबंधितांना बैठकीत दिले. या बैठकीस प्रभारी कार्यकारी अभियंता नीरज आहुजा यांच्यासह उपविभागीय अभियंता व शाखा स्तरावरील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात ६५० कोटींहून अधिक वीजबिल थकबाकी आहे. त्यात इचलकरंजी विभागात थकबाकी जास्त आहे. या वीज बिल थकबाकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आढावा बैठकीदरम्यान मुख्य अभियंता कावळे यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचेशी संवाद साधला. त्यांनी या संवादातून वीजबिल वसुलीची कार्यपद्धती व उद्दिष्ट स्पष्ट करून अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविले. वीजग्राहकांनी थकीत व चालू वीजबिलाचा भरणा करून ह्यमहावितरणह्णला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.इचलकरंजीतील थकबाकी१.घरगुती ४७ हजार ५८५ ग्राहक : २० कोटी ४९ लाख२. वाणिज्य ६ हजार २२६ ग्राहक : ४ कोटी ६२ लाख३. औद्योगिक ९ हजार २३३ ग्राहक : ४५ कोटी ९७ लाख४. पथदिवे २४१ ग्राहक : ४ कोटी ६ लाख५. पाणीपुरवठा ५०९ ग्राहक : १ कोटी ९० लाख६. सार्वजनिक सेवा २५९ ग्राहक : ३० लाख