कोल्हापूर : कोल्हापूरातील छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थळ आणि पुरातन अंबाबाई मंदीराच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. अंबाबाई मंदीराच्या विकासासाठी ७८ कोटी रुपए तर शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी १३ कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी दिली.विधानसभेत राज्यातील पुणे, कोल्हापूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शशिकांत शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित केला. त्यावर शिवसेनेचे सुनिल मिणचेकर यांनी याबाबत उपप्रश्न उपस्थित केला. त्यास उत्तर देताना मंत्री पाटील यांनी ही माहिती दिली.अंबाबाई मंदीराच्या आराखड्यास मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अंतिम मंजूरी मिळणे बाकी आहे. मात्र मंदीराच्या विकासासाठी ७८ कोटी रूपयांच्या निधीस मंजूरी देण्यात आलेली आहे. तसेच शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाच्या ठिकाणी वस्तुसंग्रहालय उभारण्यात येणार असून मंजूर केलेल्या १३ कोटी रूपयांपैकी ३ कोटी रुपए कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून देण्यात आले आहेत.सार्वजनिक बांधकाम विभाग स्वत:च विकास करणारयासाठी दोनवेळा निविदा मागविण्यात आल्या. परंतु दोन्ही वेळी कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वस्तुसंग्रहालय आणि विकासाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्वत:च करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.पर्यटनस्थळांच्या विकासासाठी १७७३ कोटीराज्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी १७७३ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आतापर्यंत २३ जिल्ह्यांनी पर्यटन स्थळाच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडे प्रस्ताव सादर केल्याची माहीती पर्यटन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी दिली.