शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"
2
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
3
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
4
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
5
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
7
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
8
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
9
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
10
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
11
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
12
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
13
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
14
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
15
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
16
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
17
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
18
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
19
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
20
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा

‘भोगावती’साठी ७८ टक्के मतदान

By admin | Published: April 24, 2017 1:01 AM

‘भोगावती’साठी ७८ टक्के मतदान

भोगावती : परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी २१ जागांसाठी अत्यंत चुरशीने पण तितकेच शांततेत ३० हजार ५१८ पैकी २४ हजार १६४ मतदान (७८ टक्के) झाले. आज, सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून रमणमळा, कसबा बावडा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे. साधारणत: सायंकाळी पाचनंतर निकालाचा कल स्पष्ट होईल, असा अंदाज आहे. ७४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. राजर्षी शाहू आघाडी, दादासाहेब पाटील-कौलवकर महाआघाडी व परिवर्तन आघाडी अशी तिरंगी लढत झाली. २१ जागांसाठी ७४ उमेदवार रिंगणात होते. रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून ५८ गावांतील केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच असली तरी काही शाब्दिक चकमकवगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळी दहापर्यंत मतदान केंद्रांबाहेर रांगा लागल्या होत्या. आज, सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होणार असून दुपारी दोनपर्यंत मतपत्रिकांचे एकत्रिकरणाचे काम सुरू राहणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मोजणीस सुरुवात होणार असून साधारणत: निकालाचा कल सायंकाळी पाचनंतर स्पष्ट होईल, असा अंदाज निवडणूक यंत्रणेचा आहे. प्रमुख गावांत झालेले मतदान (कंसात एकूण मतदान)गुडाळ ८०४ (१०२०), पिरळ ३७३ (४४१), कंथेवाडी ३२० (४७५), अणाजे ३४० (४४८), मुसळवाडी ३१६ (४५५), कुर्डू ४९० (६४२), कौलव ७७३ (१०१४), कसबा तारळे ७३५ (९३४), हसूर ६४६ (८२१), कांचनवाडी २६५ (३५५), सोनाळी २८८ (३६०), म्हालसवडे ५४२ (६३७), कोथळी ७०० (१०४५), खिंडी व्हरवडे २३८ (४३७), शिरगांव ५९८ (८०१), कुरूकली ७१२ (१०२३), तरसंबळे ३१६ (४५५), ठिपकुर्ली ९३३ (११०७), राशिवडे ११२५ (१४८६). तरुणांची गर्दीकारखान्याचे जुने व वयस्कर मतदार असल्याने त्यांचे मतदान घरातील तरुण मंडळीच करत होती. भोपळवाडी येथील हरि दत्तू भोपळे (वय १०५) यांनी मतदानाचा हक्क बजावला. संस्था गटात काटा लढत संस्था गटातील निवडणूक चुरशीने झाले असून ४६८ पैकी ४६० मतदान झाले. या गटात महाआघाडी व शाहू आघाडीने विजयाचा दावा केल्याने या निकालाकडे लक्ष लागले आहे.