शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
3
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
4
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
5
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
6
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
8
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
9
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
11
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
12
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
13
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
14
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
15
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
16
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
17
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
19
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
20
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

सांगली जिल्हा परिषदेसाठी ७८४ अर्ज

By admin | Published: February 07, 2017 1:11 AM

मिरज, वाळवा, आटपाडीत गर्दी : भाजप, काँगे्रस, राष्ट्रवादीमध्ये बंडखोरीची चिन्हे; पंचायत समितीसाठी १३०६ अर्ज

सांगली : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ६० जागांसाठी ७८४, तर पंचायत समितींच्या १२० जागांसाठी १३०६ अर्ज दाखल झाले आहेत. मिरज, वाळवा आणि आटपाडी तालुक्यातून सर्वाधिक अर्ज आहेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी तासगाव, मिरज आणि खानापूर तालुक्यांमध्ये एबी फॉर्म स्वीकारण्यावरून प्रशासन आणि कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वादावादीचे प्रकार घडले. तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा जागांसाठी ११५, तर पंचायत समितीच्या ११२ जागांसाठी १३० अर्ज दाखल आहेत. भाजपकडून जिल्हा परिषद मांजर्डे, सावळज गट आणि पेड, सावळज, बोरगाव, मणेराजुरी, येळावी, कुमठे येथील पंचायत समिती गणातील उमेदवारांना कोरेच एबी फॉर्म देण्यात आले. तेही वेळेत दिले नसल्याची राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तक्रार केली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. प्रशासनही पेचात सापडले होते. अखेर दोन जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समितीचे एबी फॉर्म रद्द केल्याचा निर्णय देण्यात आला. त्यामुळे भाजपच्या येथील उमेदवारांना अन्य चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. मिरज तालुक्यातील ११ जागांसाठी १३० आणि पंचायत समितीच्या २२ जागांसाठी २१० अर्ज दाखल झाले.खानापूर तालुक्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी एबी फॉर्मच दिले नसल्यामुळे प्रशासनाचा गोंधळ निर्माण झाला. येथील जिल्हा परिषदेच्या तीन जागांसाठी ३२ आणि पंचायत समितीच्या सहा जागांसाठी ७१ अर्ज दाखले झाले आहेत. आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी विक्रमी १३३ आणि पंचायत समितीच्या आठ जागांसाठी १७५ अर्ज दाखल झाले. अनेक उमेदवारांनी दोन अर्ज दाखल केल्यामुळे अर्जांची संख्या जास्त दिसत आहे. मंगळवारी (दि. ७) छाननी असून त्यानंतर इच्छुकांची संख्या कमी होणार आहे. (प्रतिनिधी) दिवसभरातील घडामोडी आणि लढती...- काँग्रेसच्या मदनभाऊ-विशाल पाटील गटामधील मिरज तालुक्यातील संघर्ष अखेरच्याक्षणी मिटला.- मिरज पूर्व भागात काँग्रेस, राष्ट्रवादी, अजितराव घोरपडे आघाडी, तर मिरज पश्चिममध्ये काँग्रेससोबत स्वाभिमानी शेतकरी संघटना.- रयत विकास आघाडीची फारकत घेत वाळव्यात जिल्हा परिषदेच्या तीन आणि पंचायत समितीच्या दहा जागांवर काँग्रेस स्वबळावर, शिवसेना व राष्ट्रवादी स्वतंत्र.- आटपाडीत राजेंद्रअण्णा देशमुख गटाची भाजपमधून उमेदवारी. शिवसेना स्वतंत्र, तर काँग्रेस व राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमानी विकास आघाडी एकत्र.- खानापुरात दोन्ही काँग्रेस, भाजपची चिन्हे गोठवून आघाडी; शिवसेना स्वतंत्र- कवठेमहांकाळला राष्ट्रवादी व अजितराव घोरपडे गटाची आघाडी, मात्र ते पक्षाच्या चिन्हावर लढणार; भाजपची चिन्ह गोठवत काँग्रेसशी आघाडी- जतला जनसुराज्य-काँग्रेस युती, काँग्रेसच्या वसंतदादा आघाडीची राष्ट्रवादीबरोबर आघाडी, भाजप स्वतंत्र- पलूस-कडेगावमध्ये काँग्रेसविरोधात भाजप व राष्ट्रवादीची आघाडी- तासगाव तालुक्यात राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस अशी लढत- शिराळा तालुक्यात काँग्रेस-राष्ट्रवादी विरूध्द भाजप