शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
3
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
4
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
5
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
6
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
7
"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
8
धुळे जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात सर्व पक्षांना मत विभाजनाची भीती
9
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल
10
मविआतील नेत्यांच्या फोटोंचा वापर; शेकाप उमेदवारावर गुन्हा नोंदवण्याची मागणी!
11
“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
12
जंगल थीम, केक अन्...; आलिया-रणबीरच्या लेकीचा दुसरा वाढदिवस, राहाच्या बर्थडे पार्टीतील Inside फोटो
13
अर्जुन कपूर करतोय एकटेपणाचा सामना? मलायकाशी ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच स्पष्ट बोलला
14
"अमेरिकन जनतेसाठी कमला हॅरिस चॅम्पियन आहेत, कायम राहतील"; जो बायडेन यांनी केलं कौतुक
15
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
16
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
17
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
18
ऑस्ट्रेलियात Dhruv Jurel नं राखली लाज; संघ अडचणीत असताना हा पठ्ठ्या एकटा लढला!
19
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
20
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी

ग्रामपंचायत, नगरपालिकांची ७,८४१ कोटींची वीज थकबाकी माफ; ऊर्जा विभागाचा मोठा निर्णय 

By समीर देशपांडे | Published: January 11, 2023 1:56 PM

मुद्दलाची रक्कम शासन महावितरणला भरणार

कोल्हापूर : राज्यातील ग्रामपंचायत, नगरपालिकांची पाणी योजना आणि रस्त्यावरील दिव्यांची सात हजार ८४१ कोटींची व्याज आणि मुद्दलाची वीज थकबाकी माफ करण्यात आली आहे. यातील व्याज महावितरण माफ करणार असून मुद्दलाची रक्कम शासन महावितरणला भरणार आहे. याबाबत सोमवारी ऊर्जा विभागाने आदेश काढला आहे.केंद्र शासनाच्या कर्जविषयक मार्गदर्शक तत्त्वांमध्ये वित्तीय संस्थांनी आणि राष्ट्रीयीकृत बॅंकांनी वीजवितरण कंपन्यांना कर्ज मंजूर करताना शासकीय विभागांची वीज देयके थकबाकी शून्य असण्याची अट घातली आहे. यामुळे महावितरणला नवीन कर्ज उभारणी अशक्य झाले आहे. एकीकडे प्रचंड प्रमाणात थकबाकी आणि दुसरीकडे कर्ज उभारणीवर आलेल्या मर्यादा यातून मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ जुलै २०२२ रोजी घेतलेल्या बैठकीत एकरकमी परतफेड योजना तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार हा माफीचा निर्णय घेण्यात आला आहे.

हा घेतला निर्णय

  • ३० जून २०२२ पर्यंत ग्रा.पं.चे पाणी योजना आणि पथदिव्यांची ३,७७५ कोटी रुपये मुद्दल थकीत आहे. ही रक्कम शासन भरणार आहे. तर व्याजाची तीन हजार ६८२ कोटी रुपयांची रक्कम महावितरण माफ करणार आहे.
  • याच मुदतीतील नगर पंचायती आणि नगरपालिकांची १८६ कोटी २५ लाख रुपयांची मुद्दल थकबाकी शासन भरणार आहे. तर १९८ कोटी ६४ लाख रुपयांचे व्याज महावितरण माफ करणार आहे.
  • ३० जून २०२२ नंतरची ही बिले मात्र ग्रामपंचायत, नगर पंचायत आणि नगरपालिकांना भरावी लागणार आहेत.

महावितरणवरील कर्ज३१ मार्च २०२०/ ३९ हजार १५२ कोटी रुपये३० जून २०२२/ ५३ हजार ३६९ कोटी रुपयेमहावितरणची थकबाकी३१ मार्च २०२०/ ५९ हजार ८३३ कोटी रुपये३१ मे २०२२/ ६७ हजार १४९ कोटी रुपयेकर वाढवण्याबाबत उदासीनता

  • ग्रामस्थांचा रोष नको, म्हणून ग्रामपंचायती घरफाळा आणि पाणीपट्टी वाढवत नाहीत. त्यामुळे अनेकवेळा वीजबिले थकीत होण्याचे प्रमाण अधिक आहे.
  • त्यामुळे एकीकडे गावागावात कोट्यवधीच्या विकास योजना राबवताना त्या त्या गावातील सुविधांच्या प्रमाणात कर आकारणी बाबत ही शासनाने बंधन घालण्याची गरज आहे.

 

वीजबिल थकबाकीमुळे गेली अनेक वर्षे स्ट्रीटलाइटच्या नव्या कामास मंजुरी मिळत नव्हती. नव्याने नागरिकरण झालेल्या वस्त्या अंधारातच राहिल्या होत्या. त्यामुळे लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत होते. या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळेल. - उत्तम आंबवडे, सरपंच, उजळाईवाडी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतelectricityवीजmahavitaranमहावितरण