शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

कोल्हापूर जिल्ह्यात ७९ हजार दुबार मतदार, गतवर्षीच्या तुलनेत 'इतके' मतदार झाले कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 4:27 PM

मतदारांच्या छायाचित्रात व माहितीत साम्य असल्याचे आढळले आहे.

कोल्हापूर : जिल्हा निवडणूक विभागाने ५ जानेवारीला जाहीर केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यात २५ हजार १५९ मतदार कमी झाले आहे, तर जिल्ह्यात एकूण ७९ हजार १२४५ मतदारांच्या छायाचित्रात व माहितीत साम्य असल्याचे आढळले आहे.

जिल्ह्यात निवडणूक विभागाच्या वतीने मतदार पुनरीक्षण कार्यक्रम राबवण्यात आला होता. त्यानुसार नवमतदारांची नोंद, मयत, पत्ता बदललेल्यांची नावे वगळणे, छायाचित्रात साम्य असलेल्या मतदारांची तपासणी करण्यात आली. जिल्हा निवडणूक विभागाने दि. ५ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार पुरुष, स्त्री व तृतीयपंथी या गटातील एकूण ३१ लाख ५० हजार ४६ मतदार जिल्ह्यात आहेत. ही आकडेवारी गतवर्षीच्या तुलनेत २५ हजाराने कमी आहे.

७९ हजार छायाचित्रात साम्यनिवडणूक विभागाच्या सिस्टीममध्ये ७९ हजार मतदारांच्या छायाचित्रांमध्ये साम्य दाखविले जात आहे. असे साम्य असलेल्या मतदारांची त्या त्या भागातील बीडीओंमार्फत गृहभेटीद्वारे चौकशी केली जाते. एकाच व्यक्तीचे दोन ठिकाणी मतदार नोंदणी दिसत असेल तर त्यांच्या सहमतीने दुसऱ्या मतदारसंघातील नावे कमी केली जातात.

सैनिकी, तृतीयपंथी मतदार वाढलेनिवडणूक विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात सैनिकी व तृतीयपंथीय मतदारांमध्ये वाढ झाली आहे. एकूण १३ सैनिकी मतदारांमध्ये, तर ३९ तृतीयपंथी मतदारांची वाढ झाली आहे.

४० ते ४९ वयोगटांतील सर्वाधिक मतदारया आकडेवारीनुसार जिल्ह्यात ४० ते ४९ वयोगटातील सर्वाधीक ६ लाख ६४ हजार ४१२ मतदार आहेत. त्या पाठोपाठ ३० ते ३९ वयोगटांतील ६ लाख ३४ हजार ९९५ मतदार २० ते २९ वयोगटातील ५ लाख ६० हजार ५८९ मतदार आहेत. नवमतदारांची संख्या २५ हजार ३८२ इतकी आहे.

शंभरी पार केलेले १८०० मतदारजिल्ह्यात वयाच्या शंभरीत असलेले तसेच शंभरी पार केलेले तब्बल १ हजार ८६७ मतदार आहेत. ही संख्या शिरोळमध्ये सर्वाधिक असून, येथे ३३५ मतदार आहेत. त्यानंतर चंदगडमध्ये २२७ मतदार या वयोगटातील आहेत.

कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदार?विधानसभा : मतदारचंदगड : ३ लाख १९ हजार ७५०राधानगरी : ३ लाख ३२ हजार ७२६कागल : ३ लाख २६ हजार २०७कोल्हापूर दक्षिण : ३ लाख ३७ हजार ४६१करवीर : ३ लाख १४ हजार ८७९कोल्हापूर उत्तर : २ लाख ८८ हजार २३९शाहूवाडी : २ लाख ९५ हजार ७८०हातकणंगले : ३ लाख २७ हजार ७५१इचलकरंजी : २ लाख ९४ हजार ४०शिरोळ : ३ लाख १३ हजार २१३एकूण : ३१ लाख ५० हजार ४६ 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक