कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात ८ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील १४ बंधारे अजूनही पाण्याखाली असून, राधानगरीतून १४०० तर; अलमट्टीतून १,२३,७९७ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.आज सकाळी ७ वाजता मिळालेल्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १४०० तर अलमट्टी धरणातून १,२३,७९७ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणात २३१.५६ दलघमी पाणीसाठा आहे, तर जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प व पाटगाव मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्येहातकणंगले- ०.१३ (४६८.२५), शिरोळ- निरंक (३६९), पन्हाळा- १.२९(१४१९.५७), शाहूवाडी- २.८३ (१७५५.६७), राधानगरी- ०.३३ (१८५०.६७), गगनबावडा- ८ (४६६४), करवीर- निरंक (९९७.९१), कागल- निरंक (११८८.७१), गडहिंग्लज- ०.४३ (८४१.२९), भुदरगड- निरंक (१४१६.२०), आजरा- निरंक (२०४६.७५), चंदगड- निरंक (२०३४.८३) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- खडक कोगे व सरकारी कोगे, कुंभी नदीवरील- सांगरूळ, कासारी नदीवरील- यवलूज, वारणा नदीवरील-चिंचोली, वेदगंगा नदीवरील- वाघापूर, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, असे एकूण १४ बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात ९७.६१८ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात १२०.०७९ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा
तुळशी ९६.३२दलघमी, वारणा ९२६.८१ दलघमी, दूधगंगा ७०३.१८ दलघमी, कासारी ७६.९९ दलघमी, कडवी ७१.२४ दलघमी, कुंभी ७२.५७ दलघमी, पाटगाव १०५.२४ दलघमी, चिकोत्रा ४२.५७ दलघमी, चित्री ५३.४१० दलघमी, जंगमहट्टी ३४.६५० दलघमी, घटप्रभा ४४.१७० दलघमी, जांबरे २३.२३० दलघमी, कोदे (ल पा) ६.०६० दलघमी असा आहे.बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे
राजाराम १८.१० फूट, सुर्वे १८.१९ फूट, रुई ४८.३ फूट, इचलकरंजी ४६ फूट, तेरवाड ४६.३ फूट, शिरोळ ३८ फूट, नृसिंहवाडी ४० फूट, राजापूर २५ फूट तर नजीकच्या सांगली १०.३ फूट व अंकली १३.१९ फूट अशी आहे.