कोल्हापूर : महापालिका प्रशासनाला विविध करांमधून झालेली उत्पन्नाची घट आणि केएमटी प्रशासनाला बसमधून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न यामुळे केएमटी प्रशासनाची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली आहे. सध्या दिवसाला केवळ साडेसहा लाख रुपये इतके उत्पन्न केएमटीच्या तिजोरीत जमा होत आहे. या अशा उत्पन्नामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे ८० लाख रुपये प्रॉव्हिडंट फंडाची देयक रक्कम भरण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर प्रॉव्हिडंट फंड न मिळाल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे, अशा दुहेरी कात्रीत केएमटी प्रशासन आणि सेवानिवृत्त कर्मचारी सापडले आहेत.कोल्हापूर महापालिका परिवहन सेवेकडील अर्थात केएमटी प्रशासन होय. सध्या केएमटीत २७७ वाहक व २२७ चालकांसह एकूण ६८० कर्मचारी सेवेत आहेत. त्यांचा मासिक पगार मिळणे अवघड बनले आहे. त्यातच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रॉव्हिडंट फंडाची सुमारे ८० लाख रुपये रक्कम देणे आहे. दरम्यान, ही रक्कम मिळण्यासाठी सातत्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना लढा देत आहेत. महापालिका व केएमटी प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिल्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पदरात काही तरी पडले आहे. आता तर काही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम प्रशासनाने भरली नसल्यामुळे त्यांना आर्थिक ओढाताण करावी लागत आहे. (प्रतिनिधी)पोलिस प्रशासनामुळे दिलासा४पोलिस प्रशासनाने थकीत असलेले प्रवासभाडे दोन टप्प्यांत केएमटी प्रशासनाला दिले आहे. ४पहिल्या टप्प्यात दोन कोटी रुपये, तर महिन्यापूर्वी सुमारे ८० लाख रुपये असे एकूण दोन कोटी ८० लाख रुपये पोलिस प्रशासनाने केएमटीला दिले आहेत. ४हेच पैसे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडासाठी प्रशासनाने वळविले. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आर्थिक बोजा कमी होण्यास मदत झाली आहे. ४आता प्रॉव्हिडंट फंडाची देयक ८० लाख रुपये रक्कम भरण्यास प्रशासनास रोजच्या मिळकतीतून मार्ग काढावा लागत आहे.
‘केएमटी’ सेवानिवृत्तांचे ८० लाख देणे बाकी
By admin | Published: May 01, 2016 12:53 AM