कोगनोळीमध्ये पुरुष ४८८२ व महिला ४५८६ असे एकूण ९४६८ मतदार आहेत. त्यापैकी ४१९४ पुरुष व ३८३९ महिला असे एकूण ८०३३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अपंग व वृद्ध मतदारांसाठी व्हीलचेअरची सोय केली होती.
येथील मतदान केंद्रावर निपाणी पोलिसांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हा राखीव पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक वाय. के. कश्यपनावर यांनी भेट देऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला. या निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या ग्रामविकास आघाडीसाठी माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील, माजी बेळगाव जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, तर भाजपप्रणीत परिवर्तन आघाडीसाठी उत्तम पाटील बोरगावकर, बसवप्रसाद जोल्ले यांनी परिश्रम घेतले.
२७ कोगनोळी
फोटो ओळ : कोगनोळीमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच्या मतदानासाठी मतदारांनी उत्साहात रांगेत उभे राहून मतदान केले.