काळम्मावाडी धरणात आजअखेर ८५.०७ टक्के म्हणजेच २१.४५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. शुक्रवारी धरणाच्या पाच वक्राकार दरवाजातून ५२०० क्युसेक, तर जलविद्युत केंद्रातून १००० क्युसेक असे एकूण ६२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदीपात्रात सुरू आहे.
दूधगंगा नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. आज दिवसभर ३५ मि.मी पाऊस नोंद झाली आहे. तर काळम्मावाडी धरण परिक्षेत्रात आजअखेर २२४७ मि. मि. इतका पाऊस झाला आहे. धरणाची पाणीसाठा क्षमता २६ टीएमसी इतकी असून, आजअखेर पाणीसाठा २१.४५ टीएमसी (८५.०७ टक्के ) इतका झाला आहे .पावसाचे प्रमाण कमी असले तरी धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण अधिक आहे. गतसाली धरण परिक्षेत्रात १५७८ मिलिमीटर पाऊस झाला होता, त्यावेळी जलाशयाची पातळी १६.७२ टी.एम.सी (६५.८४ टक्के ) इतकी होती. धरणातून नदी पात्रात केला जाणारा विसर्ग सुरू असल्याने पाणी दूधगंगा नदी पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे. यावेळी यावेळी संबंधित विभागाचे डेप्युटी इंजिनिअर भाग्यश्री पाटील, शाखा अधिकारी हरिभाऊ कुंभार, अंजली कारेकर, महादेव सावंत आदी उपस्थित होते.
३० काळम्मावाडी धरण.
फोटो: काळम्मावाडी धरणातून विसर्ग.