आजरा : मेढेवाडी (ता. आजरा) येथे शेतातील घरात ८६ हजारांची गोवा बनावटीचा दारूसाठा आजरा पोलिसांनी रात्री जप्त केला. ही कारवाई कृष्णा चंदू दळवी यांच्या शेतातील घरात रात्री दोन वाजता करण्यात आली. याप्रकरणी सोमनाथ विठ्ठल अमोणेकर (वय २३, रा. खेडगे, ता. आजरा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खबऱ्याकरवी मिळालेल्या माहितीवरून सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने रात्री मेढेवाडी येथील कृष्ण दळवी याच्या शेतातील घरावर छापा टाकला. याठिकाणी सोमनाथ आमोणेकर याने विनापरवाना गोवा बनावटीची ८५ हजार ४४२ रुपये किमतीची दारू आणून ठेवली होती.
पथकामध्ये बालाजी भांगे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, दत्ता शिंदे, अमर अडसुळे, चेतन घाडगे, अमोल पाटील यांचा समावेश होता.
जिल्हा पोलीस प्रमुखांकडून १० हजारांचे बक्षीस
आजरा पोलिसांनी गोवा बनावटीची ८६ हजारांची दारू जप्त केली आहे. कोरोना काळात संचारबंदी असताना आजरा पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई आहे. त्याबद्दल सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांना जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी १० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.
---------------------
फोटो ओळी : गोवा बनावटीची जप्त केलेली दारू व आरोपी सोमनाथ आमोणेकर याच्यासोबत सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे व पोलीस कर्मचारी.
क्रमांक : २३०४२०२१-गड-०४