कागल : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी, सोमवारी माघारीच्या दिवशी मुदतीत माघार घेण्यासाठी सर्वच राजकीय गटांनी जोरदार यंत्रणा लावली होती. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच मतदारसंघांत ३५ उमेदवारांनी माघार घेतली यामुळे २२ उमेदवार रिंगणात आहेत. पंचायत समितीच्या १० मतदारसंघांत ८७ उमेदवारांनी माघार घेतल्याने ३९ उमेदवार रिंगणात आहेत. क. सांगाव पं. स. : आवळे दीपाली दिनकर (कॉँग्रेस), मीनाक्षी युवराज पाटील (भाजप), प्रज्ञा अविनाश मगदूम (स्वा. शे. संघटना), राजश्री राजेंद्र माने (राष्ट्रवादी). पिंपळगाव खूर्द पं. स. : धनराज वि. घाटगे (शिवसेना), रमेश आ. तोडकर (राष्ट्रवादी), महादेव पाटील (राष्ट्रीय कॉँग्रेस), संकपाळ संभाजी (भाजप). सिद्धनेर्ली पं. स. : दीपाली सं. सपाटी (राष्ट्रवादी), पूनम मगदूम (शिवसेना), यशोदा हजारे (भाजप). म्हाकवे पं. स. : अनिता मा. पाटील (राष्ट्रवादी), रूपाली आ. पाटील (भाजप), वर्षा बा. पाटील (राष्ट्रीय कॉँग्रेस), मनीषा सावंत (शिवसेना). सेनापती कापशी : सुजाता देसाई (भाजप), कमल पाटील (शिवसेना), दीपाली शिंदे (राष्ट्रवादी). माद्याळ पं. स. : ज्योती मुसळे (राष्ट्रवादी), दीपक शिंदे (शिवसेना), राजेंद्र सुतार (भाजप). चिखली पं. स. : तुळशिदास किल्लेदार (अपक्ष), विश्वास कुऱ्हाडे (शिवसेना), संजय चौगुले (भाजप), प्रकाश वाडकर (राष्ट्रवादी). यमगे : राहुल कांबळे (अपक्ष), कृष्णात कुंभार (अपक्ष), नाना दाजी पाटील (भाजप), नामदेव भराडे (अपक्ष), विजय भोसले (शिवसेना), नीलेश शिंदे (राष्ट्रवादी). बोरवडे : साताप्पा कांबळे (अपक्ष), जयदीप पोवार (राष्ट्रवादी), आनंदा बल्लाळ (शिवसेना). सावर्डे बुद्रूक : भारती पाटील (शिवसेना), स्नेहा शिंदे (भाजप), अंजना सुतार (राष्ट्रवादी).
कागल तालुक्यात जि.प.३५ , पं.स.च्या ८७ जणांची माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2017 12:37 AM