कोल्हापूर : जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील ग्रामीण भागात ६८ हजार ३४८ गरोदर मातांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. यासह ९ नगरपालिकाअंतर्गत ८ हजार ५३२ व कोल्हापूर महापालिकेअंतर्गत १० हजार १५६ महिलांचे अशा एकूण ८७ हजार ३६ गरोदर मातांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या गरोदर मातांच्या कोविड लसीकरणाबाबत संपूर्ण सनियंत्रण हे जिल्हा व शहर कार्यबल गटांमार्फत केले जाणार आहे. तसेच हे लसीकरण गरोदर मातांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असल्याचा निर्वाळा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे. अधिक माहितीसाठी संबंधित गावातील आशा स्वंयसेविका, अंगणवाडी व आरोग्य सेविका तसेच स्थानिक शासकीय व खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडून लसीकरणाबाबत मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
---
तालुकानिहाय करण्यात येणारे लसीकरण
आजरा-२ हजार १११, भुदरगड-२ हजार ६५४, चंदगड-३ हजार २८९, गडहिंग्लज -३ हजार २८७, गगनबावडा-६३०, हातकणंगले-८ हजार ६८१, कागल-४ हजार ४० करवीर-८ हजार ५७७, पन्हाळा-४ हजार ४६३, राधानगरी-३ हजार ३७४, शाहूवाडी-३ हजार १६६, शिरोळ-५ हजार ३८७.
---