शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

कोल्हापूर, सांगलीतून ८९४ नमुने तपासणीसाठी पुण्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 8:19 PM

Bird Flu Kolhapur-बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून कोल्हापूर व सांगलीतून आतापर्यंत ८९४ नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेला पाठवले आहेत. दरम्यान, कोल्हापुरात अजूनही एकही मरतूक नसली तरी, लोकांकडून मागणी कमी झाल्याने चिकन व अंड्यांच्या दरातील घसरण मात्र सुरूच आहेच. याचा कोट्यवधीचा फटका पोल्ट्री व्यावसायिकांना बसला आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर, सांगलीतून ८९४ नमुने तपासणीसाठी पुण्याला बर्ड फ्लूची दक्षता : चिकन, अंड्यांच्या दरातील घसरण सुरूच

कोल्हापूर : बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून कोल्हापूर व सांगलीतून आतापर्यंत ८९४ नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेला पाठवले आहेत. दरम्यान, कोल्हापुरात अजूनही एकही मरतूक नसली तरी, लोकांकडून मागणी कमी झाल्याने चिकन व अंड्यांच्या दरातील घसरण मात्र सुरूच आहेच. याचा कोट्यवधीचा फटका पोल्ट्री व्यावसायिकांना बसला आहे.बर्ड फ्लूचा संसर्ग परदेशातील स्थलांतरित पक्ष्यांमार्फत राज्यात सुरू झाला आहे. कोल्हापूर, सांगलीत त्याचा अद्याप मागमूसही नाही. पण पशुसंवर्धन विभागाने काटेकोर नियोजन सुरू केले आहे. रोजच्या रोज आजारी कोंबड्यांचे स्त्राव तपासणीसाठी घेणे, ते पुण्यातील प्रयोगशाळेकडे पाठवणे, रोज सायंकाळी पशुसंवर्धन आयुक्तांना व्हीसीद्वारे दैनंदिन अहवाल देणे आदी कामांच्या माध्यमातून बर्ड फ्लूवर लक्ष ठेवले जात आहे.तथापि आतापर्यंत बर्ड फ्लूमध्ये मानवाचा मृत्यू झाला आहे, अशी एकही घटना राज्यात अथवा कोल्हापुरातही घडलेली नाही. शिवाय मरतूक म्हणून कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचीही नोंद नाही. तरीदेखील याचा बागुलबुवा उभा केला जात असल्याने पोल्ट्री व्यवसायावर संक्रांत आली आहे. लाखो रुपयांची गुंतवणूक आणि कोट्यवधींची उलाढाल असणाऱ्या या उद्योगात सध्या भीतीचे वातावरण आहे.बर्ड फ्लूचा अपप्रचार वाढेल तसा चिकन व अंड्यांच्या दरात घट होत चालल्याचे दिसत आहे. चार दिवसांपूर्वी होलसेलचा चिकनचा ९६ रुपये किलो असणारा दर आता ५८ रुपयांपर्यंत खाली आला आहे. किरकोळ दरही ९० ते १०० रुपये किलोवर आले आहेत. ६५ रुपये डझन असणारी अंडी ५५ रुपयांवर आली आहेत.

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लूkolhapurकोल्हापूर