कोल्हापूर : शहरातील विविध ३३ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीसाठी घेण्यात आलेल्या पहिल्या प्रवेश फेरीत कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या एकूण ५६५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. दुसऱ्या फेरीसाठी एकूण ९००१ जागा रिक्त असून त्यासाठी ७००५ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यासाठी प्रवेश प्रक्रिया शनिवार (दि. २०) पासून सुरू होणार आहे.या महाविद्यालयांतील एकूण १४ हजार ६५६ जागांवरील प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडून आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी एकूण १२ हजार ६६० विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले. समितीकडून प्रवेशाची पहिली फेरी दि. ११ जुलैपासून सुरू झाली. या फेरीतील प्रवेशाची मुदत मंगळवारी संपली.
या मुदतीत पहिली फेरी आणि व्यवस्थापन, इन हाऊस कोट्यासह एकूण ५६५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. मंगळवारी दिवसभरात ४४० विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. दुसऱ्या फेरीसाठी समितीकडे सध्या ७००५ विद्यार्थ्यांचे अर्ज आहेत. या फेरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया शनिवार (दि. २०) ते मंगळवार (दि. २३) दरम्यान होणार आहे. दुसरी फेरी अंतिम असणार आहे. त्याद्वारे अलॉट झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणे विद्यार्थ्यांना बंधनकारक राहणार असल्याची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीचे सचिव सुभाष चौगुले यांनी मंगळवारी दिली.
आकडेवारी दृष्टिक्षेपातविद्याशाखा प्रवेश क्षमता दुसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांचे अर्ज
कला (इंग्रजी माध्यम) ५३ २४कला (मराठी) २७०३ ८८६वाणिज्य (मराठी) २१८९ १५४३वाणिज्य (इंग्रजी) ७२२ १२५५विज्ञान ३३३४ ३२९७
पहिल्या फेरीत निश्चित झालेले प्रवेशकला (इंग्रजी) : ६७कला (मराठी) : ८५७वाणिज्य (मराठी) : १०२८वाणिज्य (इंग्रजी) : ७५१विज्ञान : २२८५