राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकारकडून आलेल्या कर्जमाफीच्या चौथ्या यादीतील २००९८ पैकी तब्बल ९१०० खातेदार अपात्र ठरले आहेत. पहिल्या तीन याद्यांत ज्यांना लाभ मिळाला अशी सुमारे पाच हजार खाती पुन्हा आल्याने हा गोंधळ उडाला आहे. त्याचबरोबर मूळ रकमेपेक्षा कमी रकमेसह इतर त्रुटींमुळे हे खात्यांचा जमा-खर्च होऊ शकलेला नाही. आतापर्यंत जिल्ह्णातील ९२ हजार खातेदारांना १७४ कोटींच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.कर्जमाफीच्या याद्यातील घोळ शेतकºयांना नवीन नाही. पहिल्या यादीपासून काही ना काही गोंधळ सुरूच आहे. ज्यांनी कर्जमाफीचा अर्जच केलेला नाही, अशा खातेदार शेतकºयांची नावे यादीत होती. जिल्ह्यातून जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संलग्न २ लाख ५७ हजार थकबाकीदार व नियमित परतफेड करणाºया खातेदारांनी राज्य सरकारकडे कर्जमाफीसाठी प्रस्ताव दाखल केले होते. या अर्जाची कर्जमाफीच्या निकषांनुसार छाननी होऊन पात्र खातेदारांची नावे टप्प्या-टप्प्याने जाहीर करण्यात येत आहेत. पहिल्या तीन याद्यांच्या माध्यमातून कशीबशी ८१ हजार १२० खातेदारांना कर्जमाफीचा लाभ मिळाला.कर्जमाफीचा लाभ मिळण्यास होत असलेला विलंब, याद्यांतील गोंधळावरून विरोधी पक्षांनी सरकारविरोधात रान उठवले होते. हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीवरून सरकारची कोंडी करण्याची रणनीती विरोधकांनी आखली होती. त्यामुळे सरकारने घाईगडबडीने कर्जमाफीच्या याद्या जिल्हास्तरावर पाठविण्याचा प्रयत्न केला.त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्णासाठी कर्जमाफीची तब्बल ७९ हजार खातेदारांची जम्बो चौथी यादी आली. या यादीने तर कमाल केली. आमदार, माजी खासदारांची नावे असल्याने सरकारवर ही यादी मागे घेण्याची नामुष्की ओढावली. चार-पाच दिवसाने सुधारित २० हजार ९८ खातेदारांची यादी जिल्हा बँकेला आली आणि त्याची तपासणी सुरू झाली. ज्या शेतकºयांना अगोदर लाभ झाला आहे, त्याच शेतकºयांची नावे पुन्हा चौथ्या यादीत आली आहेत. तब्बल ५ हजार अशा खात्यांचा समावेश असल्याने ही खाती तपासणीत अपात्र ठरविण्यात आली. एखाद्या शेतकºयाची दोन खाती आहेत, त्यातील एका खात्याचे पैसे आले आणि दुसºया नाही. अशा खात्यांचा जमा-खर्च करता येत नसल्याने तशी नावेही पुन्हा आयटी विभागाकडे पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे तब्बल ९१०० खातेदार अपात्र ठरले आहेत. जिल्हा बँकेने १० हजार ९०८ खात्यांचा जमा-खर्च पूर्ण केला असून एकरकमी परतफेड योजनेतील १२८ खात्यांचा अद्याप जमा-खर्च करायचा आहे.पावणेदोन लाख शेतकºयांना प्रतीक्षाराज्य सरकारने जून २०१७ मध्ये कर्जमाफीची घोषणा करून पात्र शेतकºयांकडून प्रस्ताव मागविले. त्यानुसार जिल्ह्यातून अडीच लाखांहून अधिक शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले. गेल्या सहा महिन्यांत केवळ ९२ हजार २८ खातेदारांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे. त्यामुळे अजून सुमारे पावणेदोन लाख खातेदारांना आपल्या नावाची प्रतीक्षा आहे.असा झाला चौथ्या यादीचा जमा-खर्चयादीतील खातेदारांची संख्या२००९८ (२८ कोटी)पात्र थकबाकीदार१५६३(५ कोटी २१ लाख)नियमित परतफेड करणारे ९३४५(१३ कोटी ४६ लाख)
कर्जमाफीतील ९१०० खातेदार अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 1:08 AM