कोल्हापूर : रमणमळा येथे बंद बंगल्याचे लोखंडी कॅच वाकवून ७० हजार रुपये, दोन पिळाच्या सोन्याच्या अंगठ्या असा सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना बुधवारी (दि. ६) सायंकाळी उघडकीस आली. याबाबत अरुण वसंतराव तिरोडकर (वय ६९, रा. ओमकार बंगला, प्लॉट नंबर , शासकीय गोडावूनजवळ, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली.याबाबत पोलिसांनी सांगितले की, तिरोडकर यांचा एक मार्च ते मंगळवार (दि. ५) दरम्यान बंगला बंद होता. या कालावधीत अज्ञात चोरट्याने दरवाजाचे लोखंडी कॅच वाकवले होते.
तिरोडकर हे बुधवारी घरी आले असता त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी हा प्रकार पोलिसांना कळविला. त्यानूसार पोलिसांनी पंचनामा केला.
बेडरुममधील लोखंडी कपाटात ठेवलेले ७० हजार रुपये, दहा ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या असा सुमारे ९० हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला.याची नोंद पोलिसात झाली आहे.