नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी अनेक राज्यांतून असंख्य भाविक हजेरी लावत असतात. सध्या कोरोना महामारीची महाराष्ट्रात दुसरी लाट वेगाने पसरत आहे. तसेच लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांत लॉकडाऊन नसताना महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आदी राज्यांतून अनेक भाविक दत्त दर्शन तसेच विविध कार्यक्रमांसाठी मोठ्या संख्येने येत होते. मंदिरात प्रवेश करताना शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे मास्क, सॅनिटायझर तसेच सुरक्षित अंतर ठेवण्यात येत होते. असे जरी असले तरी देवस्थान व ग्रामपंचायतीच्या अनेक कर्मचाऱ्यांना स्वच्छता तसेच अन्य कारणांसाठी भाविकांच्या संपर्कात यावे लागत होते. याचा विचार करून ४५ वर्षांवरील तसेच इतर कर्मचारी, फ्रंट वर्कर असे सुमारे १२५ कर्मचारी असून, ९० टक्के कर्मचाऱ्यांनी पहिला तर ८५ टक्के कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एस. पाखरे, सरपंच पार्वती कुंभार, उपसरपंच रमेश मोरे व कोरोना समितीने पुढाकार घेतला असल्याचेही अध्यक्ष पुजारी यांनी सांगितले.
नृसिंहवाडी दत्त देवस्थान कर्मचाऱ्यांचे ९० टक्के लसीकरण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 4:22 AM