कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर कमी झाल्याने गेल्या महिन्याभरात दरात ९०० ने घट झाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने सोन्यावरील कस्टम ड्युटी वाढवली नसली तर हा दर आणखी कमी झाला असता. बुधवारी सोन्याचा दर ५१ हजार ७०० रुपये होता. गेल्या महिन्याभरात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर उतरला आहे.तर केंद्राने कस्टम ड्युटी १० टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर नेल्याने सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात चढउतार होत आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचा दर ५१ हजार १०० रुपये होता. हा गेल्या महिन्यातील सर्वात नीचांकी दर होता. त्यानंतर पुन्हा दर कमी जास्त होत राहिला. मागील आठवड्याभरात ५१ हजार ७०० वर स्थिर राहिला आहे.
चांदी ५८ हजारांवरएकीकडे सोन्याचा दर उतरला असताना चांदीचा दर मात्र गेल्या महिन्याभरात ४ हजारांनी वाढला आहे. मागील महिन्यात ५४ हजार ८०० रुपये किलो असा चांदीचा दर होता, तो वाढून ५९ हजारांवर गेला होता. आता या महिन्यात ५८ हजारांवर स्थिरावला आहे.
...तर आणखी कमी झाला असताकेंद्र सरकारने सोन्यावरील कस्टम ड्युटी वाढवली नसती तर सोन्याचा दर आणखी कमी झाला असता. कस्टम ड्युटी वाढवण्याआधी सोने ५० हजारांपर्यंत गेले होते.मागील महिन्याभरात सोन्याचा दर असा७ जुलै : ५१ हजार १००१७ जुलै : ५० हजार ७००२९ जुलै : ५१ हजार ७००३ ऑगस्ट : ५१ हजार ७००