शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

सरपंच मानधनासह कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे ९१ कोटी जमा

By समीर देशपांडे | Published: August 16, 2024 1:09 PM

समीर देशपांडे कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ग्रामपंचायत सरपंच , उप सरपंच यांचे मानधन आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अजिबात ...

समीर देशपांडेकोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांचे मानधन आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अजिबात प्रलंबित राहू नये याची काळजी ग्रामविकास विभागाने घेतली आहे. नेहमी ईआरपी प्रणालीने ही रक्कम अदा होत असली तरी सध्या ही प्रणाली राबवण्यात तांत्रिक अडचणी असल्याने जुलै आणि ऑगस्ट २०२४ च्या मानधन, वेतनाचे ९१ कोटी १७ लाख ८४ हजार रुपये शासनाकडून ऑफलाइन पद्धतीने अदा करण्यात आले आहेत.‘आपले सेवा केंद्र’ चालवणारी राज्यस्तरीय कार्यरत कंपनी बदलण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यामुळे मानधन आणि निधी वितरणामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. याची दखल घेत पंचायत राज विभागाच्या राज्य व्यवस्थनापन कक्षाने हा निधी जिल्हा परिषदांना वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. पंचायत राजचे संचालक सचिन घाडगे यांनी याबाबतचे सविस्तर पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवले असून, त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पातळीवर कार्यवाहीही सुरू झाली आहे.राज्यात साडे अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती कार्यरत आहेत. परंतु, काही ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच राजीनामा देत असल्याने त्या ठिकाणी नव्याने निवडी केल्या जातात. त्यामुळे ग्रामपंचातींच्या संख्येपेक्षा सरपंच, उपसरपंच यांची संख्या अधिक दिसून येत आहे.

पद  - संख्या - वितरित रक्कम रूपयेराज्यातील सरपंच - २९,७४१ - १६,३१,१६,६७२उपसरपंच - ३१,१६६ - ६८,६३,१०,६२६ग्रा.पं. कर्मचारी - ४८,००४ - ६,२३,५७,२४६एकूण -  ९१,१७,८४,५४४

किती असते मानधन?ग्रा. पं. वर्गवारी  -  सरपंच दरमहा मानधन - उपसरपंच मानधन० ते २ हजार लाेकसंख्या - ३ हजार  -  १ हजार रु.२००१ ते ८००० लोकसंख्या - ४ हजार - १५०० रु.८००१ पेक्षा जास्त लोकसंख्या - ५ हजार - २००० रु.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायतfundsनिधी