राधानगरी व कसबा वाळवे येथील कोविड काळजी केंद्रात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागांमध्ये सध्या कोरोना संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत राधानगरी तालुक्यातील पूर्व भागातील गावांसाठी कसबा वाळवे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत या केंद्रांतर्गत १४ गावे येतात वाढता संसर्ग लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या वतीने आरटी पीसीआर व अँटिजन चाचण्या घेतल्या जातात या विभागातील विविध गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन आरोग्य विभागाचे कर्मचारी चाचण्या घेत आहेत तरीही नागरिक मोठ्या प्रमाणावर त्याला प्रतिसाद देत नाहीत
प्राथमिक आरोग्य केंद्र कसबा वाळवे अंतर्गत येणाऱ्या १४ गावांमधील आढळलेले रुग्ण असे कंसात बरे झालेले - कसबा वाळवे ३७ (७४)
चंद्रे ७ (२०) अर्जुनवाडा ८ (२१)पालकरवाडी ८ (१०) तिटवे १३ (८)कासारवाडा ३ (९) चांदेकर वाडी ३ (८) तुरंबे ५ (१५) कपिलेश्वर १( ४) मांगोली १ (९) मांगेवाडी २ (५) तळाशी १ (१०) माजगाव २ (९) आकनूर ० (५)
कोट
ग्रामस्थांनी प्रशासनास सहकार्य करावे
कसबा वाळवे गावात रुग्णसंख्या वाढत असल्याने विशेष काळजी घेतली जात आहे ज्या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत.