शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
2
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
3
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
4
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
5
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
6
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
7
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
8
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
9
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
10
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
11
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
12
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
13
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
14
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
15
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
16
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
17
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
20
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

९२१ नवे रुग्ण, ५० कोरोना बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 4:25 AM

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी कोरोना रुग्णसंख्या वाढीला काहीसा ब्रेक लागला. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार नवे ९२१ रुग्ण ...

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी कोरोना रुग्णसंख्या वाढीला काहीसा ब्रेक लागला. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार नवे ९२१ रुग्ण सापडले, तर बळींचा आकडाही ५० वर आला. हाच मृत्यूचा आकडा गेल्या दोन दिवसांपेक्षा दहा ते पंधराने कमी झाला आहे. १०७२ जण कोरोनामुक्तही झाले आहेत. करवीर, शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, आजऱ्यात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत गेल्या चार दिवसांपासून कोरोना संसर्ग झालेल्यांची व मृत्यू होणाऱ्यांची संख्या उच्चांकावर पोहोचल्याने जिल्ह्यात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्यासह स्थानिक प्रशासनानेही नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली असून, संपूर्ण तालुक्यात कर्फ्यू लावले जात आहेत. गावेच्या गावे, शहरेच्या शहरे वेशीवर बॅरिकेेड्स लावून येणे-जाणेच बंद केले जात आहे. त्याचा परिणाम दिसत असून, दीड हजारावर पोहोचलेली रुग्णसंख्या आता हजाराच्या आत आल्याने काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात ५० जणांचा बळी गेला आहे. यातील सात इतर जिल्ह्यांतील, तर ४३ मृत्यू काेल्हापूर जिल्ह्यातील आहेत. एकूण पॉझिटिव्ह रुग्णाची संख्याही ११ हजार २३९ वर पोहोचली आहे, तर दिवसभरात १०७२ जण डिस्चार्ज झाले आहेत.

चौकट

५० पैकी ३९ मृत्यू ६० च्या आतील

रविवारी कोल्हापुरात कोरोनाने मृत्यू झालेल्या वयोगटावर नजर टाकल्यावर २४ ते ५० या कमावत्या गटातील नागरिकांची संख्या जास्त दिसत आहे. एकूण मृत्यूपैकी ११ मृत्यू हे ६० वयावरील आहेत, तर उर्वरित तब्बल ३९ मृत्यू हे साठीच्या आतील आहेत. त्यातही ५० च्या आतील मृत्यू होणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे. कुंभोज येथील २४ वर्षीय, तर आर. के. नगर येथील ३१ वर्षीय तरुण, वेसर्डे व शनिवार पेठ येथील ३४ वर्षीय तरुणी कोरोनाला बळी पडल्या आहेत.

जिल्ह्यात या ठिकाणी झाले कोरोनाचे मृत्यू

कोल्हापूर शहर : १३ जवाहरनगर, शनिवार पेठ, रुईकर कॉलनी, राजारामपुरी, कारंडे मळा, आर. के. नगर, जरगनगर, राजेंद्रनगर, सिंधूनगर, हरिओम नगर रंकाळा, शिवाजी पार्क, गुजरी, सरनाईक वसाहत,

करवीर : ४

भुये, माटेनगर, निगवे दुमाला, वडणगे,

शिरोळ : ३

नवे दानवाड, जयसिंगपूर, कागवाड,

पन्हाळा : ४

अंंबपवाडी, शहापूर, कोडोली, बच्चे सावर्डे,

भुदरगड : ४

सिमलवाडी करीवाडी, वेसर्डे, करंबळी, गारगोटी, हणबरवाडी,

हातकणंगले : ४

कुंभोज, कोरोची, अंबप, रुकडी,

चंदगड : १ कासेगळे,

कागल : १ सांगाव,

आजरा : ३ महागाव, आजरा, खोराटवाडी,

गडहिंग्लज: १ मुगळी,

इचलकरंजी : ४ इचलकरंजी,

कोरोना अपडेट

९ मे २०२१ ची आकडेवारी

आजचे रुग्ण : ९२१

आजचे जिल्ह्यातील मृत्यू : ४३

इतर जिल्ह्यातील मृत्यू : ०७

उपचार घेत असलेले : ११ हजार २३९

आजचे डिस्चार्ज : १०७२

सर्वाधिक रुग्ण :

कोल्हापूर शहर : २११

करवीर ११९

शिरोळ १०४

हातकणंगले : ९०

कोल्हापूर शहर मृत्यू : १३ (प्रत्येकी एक)

जवाहरनगर, शनिवार पेठ, रुईकर कॉलनी, राजारामपुरी, कारंडे मळा, आर. के. नगर, जरगनगर, राजेंद्रनगर, सिंधूनगर, हरिओम नगर रंकाळा, शिवाजी पार्क, गुजरी, सरनाईक वसाहत.,

तालुकानिहाय मृत्यू रुग्ण

करवीर ०४ ११९

हातकणंगले ०४ ९०

भुदरगड ०४ १०

पन्हाळा ०४ ५५

शिरोळ ०३ १०४

आजरा ०३ ५०

शाहूवाडी ०० २४

गडहिंग्लज ०१ ३७

चंदगड ०१ ३९

राधानगरी०० ०९

कागल ०१ २९

गगनबावडा ०० ०२

नगरपालिकानिहाय रुग्ण : ५५

इचलकरंजी २८

जयसिंगपूर २५

पेठवडगाव ०२

दिवसभरातील लसीकरण : २३२८

पहिला डोस घेतलेले नागरिक : १८०३

दुसरा डोस घेतलेले नागरिक : ५२५