कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील ८६० पैकी ८१७ शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या विद्यार्थ्यांचे बारावीचे गुण राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या संगणक प्रणालीमध्ये नोंदविले आहेत. या शाळांनी गुण नोंदविण्याची अंतिम मुदत आज, शुक्रवारपर्यंत आहे.
या विभागातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील १ लाख १७ हजार ७५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून त्यांना दहावी, अकरावी आणि बारावीतील अंतर्गत गुणांच्या आधार त्यांचे मूल्यांकन करून अंतिम निकाल जाहीर करण्याचा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यापासून मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू झाली. राज्य शिक्षण मंडळाच्या सूचनेनुसार कोल्हापूर विभागातील ८६० शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी संगणक प्रणालीमध्ये विद्यार्थीनिहाय गुणांची नोंद करण्याच्या कार्यवाहीचा प्रारंभ झाला. आतापर्यंत कोल्हापूर विभागातील ९५ टक्के शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी गुणांची नोंद केली. उर्वरित पाच टक्के शाळांकडून शुक्रवारपर्यंत प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर या शाळा, महाविद्यालयांनी त्यांनी नोंदविलेल्या गुणांच्या स्थळ प्रती (हार्डकॉपी) शिक्षण मंडळाने निश्चित करून दिलेल्या वितरण केंद्रांवर जमा करायच्या आहेत. कोल्हापूर विभागामध्ये एकूण १५ वितरण केंद्रे आहेत. या वितरण केंद्रांकडून या स्थळ प्रती शिक्षण मंडळाकडे जमा केल्या जाणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव देविदास कुलाळ यांनी गुरुवारी दिली.
चौकट
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रतीक्षा
इयत्ता अकरावीतील प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे संकेतस्थळ तांत्रिक अडचणीमुळे बंद आहे. त्यामुळे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सीईटीचा अर्ज भरण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. कोल्हापूर शहरात गुरुवारी काही नेटकॅफेमध्ये संकेतस्थळ पूर्ववत सुरू होईल याची प्रतीक्षा करत विद्यार्थी थांबले होते. दरम्यान, सीईटीचा अर्ज भरण्याचे संकेतस्थळाबाबतची तांत्रिक अडचण अद्याप कायम आहे. त्यामुळे अर्ज भरता येत नसल्याचे निवृत्ती चौक परिसरातील नेटकॅफे चालक ऋषिकेश पाटील यांनी सांगितले.
पॉईंटर
कोल्हापूर विभागातील बारावीचे विद्यार्थी
कला : ३४०९३
वाणिज्य : २७६७३
विज्ञान : ५००७६
एमसीव्हीसी : ५८४१
टेक्निकल : ६८
फोटो (२२०७२०२१-कोल-नेटकॅफे फोटो ०१, ०२) : कोल्हापुरात गुरुवारी सीईटी परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरण्याचे संकेतस्थळ पूर्ववत सुरू होईल याच्या प्रतीक्षेत काही विद्यार्थी, विद्यार्थिनी निवृत्ती चौक परिसरातील एका नेटकॅफेमध्ये थांबून होते. (छाया : नसीर अत्तार)
220721\22kol_2_22072021_5.jpg~220721\22kol_3_22072021_5.jpg
फोटो (२२०७२०२१-कोल-नेटकॅफे फोटो ०१, ०२) : कोल्हापुरात गुरूवारी सीईटी परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरण्याचे संकेतस्थळ पूर्ववत सुरू होईल याच्या प्रतिक्षेत काही विद्यार्थी, विद्यार्थींनी निवृत्ती चौक परिसरातील एका नेटकॅफेमध्ये थांबून होते. (छाया : नसीर अत्तार)~फोटो (२२०७२०२१-कोल-नेटकॅफे फोटो ०१, ०२) : कोल्हापुरात गुरूवारी सीईटी परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरण्याचे संकेतस्थळ पूर्ववत सुरू होईल याच्या प्रतिक्षेत काही विद्यार्थी, विद्यार्थींनी निवृत्ती चौक परिसरातील एका नेटकॅफेमध्ये थांबून होते. (छाया : नसीर अत्तार)