कोल्हापूर : गेले दोन दिवस कमी आलेल्या कोरोना रुग्णसंख्येने बुधवारी पुन्हा ९०० च्या वर उसळी घेतली आहे. संध्याकाळी संपलेल्या २४ तासांत ९६९ नवे रुग्ण आढळले असून, ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कोल्हापूरच्या सहा, तर इचलकरंजीच्या पाचजणांचा समावेश आहे. तब्बल ५६२ जण कोरोनातून बरे झाले आहेत.गेल्या आठवड्यापासून रुग्णांची आणि मृतांची संख्या ही प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या चिंतेचा विषय बनली आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तालुका पातळीवर डेथ ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गेल्या २४ तासांत कोल्हापूर शहरात तब्बल ३१२ नवे रुग्ण आढळले असून, त्याखालोखाल करवीर तालुक्यात ११८ रुग्ण आढळले आहेत. शिरोळ तालुक्यात ९५, तर इचलकरंजीमध्ये ६७ रुग्ण आढळले आहेत. अन्य जिल्ह्यातील आणि राज्यातील तब्बल ८४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.दिवसभरामध्ये १५३४ जणांची तपासणी करण्यात आली असून, २५७० जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. १४२० जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली असून, ८२५० रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.
- करवीरमध्ये चार मृत्यू, तर आजऱ्यात तीनकोल्हापूर ०६
- कणेरकर नगर फुलेवाडी, राजारामपुरी, प्रतिभानगर, शाहूपुरी, सानेगुरुजी वसाहत, कळंबा
इचलकरंजी ०५
- जवाहरनगर दोन, विठ्ठलनगर शहापूर, भारतमाता हौसिंग सोसायटी, अवधूत नगर शहापूर
हातकणंगले ०३
- आळते, तिळवणी, पुलाची शिरोली
करवीर ०४
- वडणगे, बहिरेश्वर, मोरेवाडी, उचगाव
आजरा ०३
- आजरा, मेंढोली, गजरगाव
गडहिंग्लज ०२
- महागाव, कडगाव
शाहूवाडी ०३ओकोली, मलकापूर, शित्तूरशिरोळ ०१
- शिरोळ
राधानगरी ०१
- म्हासूर्ली
इतर जिल्हे ०४
- सोलापूर, निपाणी, कांजिवरे, ता. देवरूख, नंदेश्वर, ता. मंगळवेढा