कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नसून शुक्रवारी संध्याकाळी संपलेल्या २४ तासात नव्या ९९८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या पाच महिन्यातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे तर २१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये इतर जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश आहे.
कोल्हापूर शहरामध्ये २३६ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून, नगरपालिका क्षेत्रात १३६ रुग्ण आढळले आहेत. अन्य तालुक्यांचा विचार करता हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १२८ तर करवीर तालुक्यात १०६ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये १६५७ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, २५७२ जणांचे स्राव तपासणीसाठी देण्यात आले आहेत. १५६९ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली असून, सध्या ६२१७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.
चौकट
कोल्हापुरातील सहा जणांचा मृत्यू
कोल्हापूर
संभाजीनगर येथील ७५ वर्षीय पुरुष, ७० वर्षीय पुरुष, ६१ वर्षीय पुरुष, टाकाळा येथील ३२ वर्षीय महिला, पंचशील कॉलनी पाचगाव येथील ८५ वर्षीय महिला, कसबा बावडा येथील उलपे मळा येथील ५८ वर्षीय पुरुष
इचलकरंजी
जुना चंदूर रोड येथील ६३ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय पुरुष
हातकणंगले
तारदाळ येथील ४६ वर्षीय पुरुष, हेर्ले येथील ६६ वर्षीय महिला, पारगाव येथील ३१ वर्षीय महिला
आजरा
उत्तूर येथील ५५ वर्षीय पुरुष,मानेवाडी येथील ६४ वर्षीय महिला
शाहूवाडी
गोगवे येथील ४७ वर्षीय पुरुष
कागल
कागल येथील ६५ वर्षीय महिला.
गडहिंग्लज
महागाव येथील ५१ वर्षीय महिला
इतर जिल्हे
भालेवाडी, सातारा येथील ३८ वर्षीय पुरुष, कोयनानगर पाटण येथील ४७ वर्षीय पुरुष, कसूप सडा रत्नागिरी येथील ६७ वर्षीय पुरुष, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पडेल येथील ७४ वर्षीय महिला, सायन मुंबई येथील ६७ वर्षीय महिला,
चौकट
अन्य जिल्ह्यातील तब्बल १११ बाधित
कोल्हापूर हे वैद्यकीयदृष्ट्या एक चांगले शहर म्हणून विकसित होत आहे. त्यामुळेच बेळगाव जिल्ह्यातील निपाणीपासून ते सिंधुदुर्ग, सांगली, सातारा इथंपासून महाराष्ट्रासह बाहेरच्या शहरांमधूनही नागरिक येथे उपचारासाठी येतात. शुक्रवारी तब्बल १११ अशा इतर जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोल्हापूरमधील अनेक नोकरदार किंवा विवाहित मुली आपल्या आई वडिलांना उपचारासाठी कोल्हापुरात दाखल करण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातील बाधितांची आणि मृतांचीही संख्या जास्त आहे.