शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

Kolhapur Crime: एसटीत सीट पकडायला खिडकीतून बॅग टाकली, चोरट्याने लांबवली, सात तोळे सोन्याचा ऐवज लंपास

By उद्धव गोडसे | Published: May 11, 2023 4:11 PM

कोल्हापूर : येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात इस्लामपूरला जाणा-या एसटीत सीट पकडण्यासाठी खिडकीतून आत टाकलेली बॅग चोरट्याने काही क्षणात लंपास ...

कोल्हापूर : येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात इस्लामपूरला जाणा-या एसटीत सीट पकडण्यासाठी खिडकीतून आत टाकलेली बॅग चोरट्याने काही क्षणात लंपास केली. बॅगमध्ये गंठण, कानातील टॉप्स असे सात तोळ्यांचे दागिने मोबाइलसह सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल होता.

हा प्रकार मंगळवारी (दि,९) सायंकाळच्या सुमारास घडला. याबाबत अश्विनी सतीश खांबे (वय ३२, रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अश्विनी खांबे या त्यांचा भाऊ सुमित पाटील याच्यासोबत एसटीने इस्लामपूरला जाणार होत्या. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात इस्लामपूरला जाणारी एसटी येताच त्यांनी सिट पकडण्यासाठी खिडकीतून आत बॅग टाकली.

गर्दीतून आत गेल्यानंतर त्यांना सिटवर बॅग आढळली नाही. चोरट्याने काही क्षणात हातोहात बॅग लंपास केली. बॅगमध्ये गंठण, कानातील टॉप्स असे सात तोळ्यांचे दागिने आणि मोबाइल होता. सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची फिर्याद खांबे यांनी शाहूपुरी पोलिसात दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी