हातकणंगले : मोबाईलवर पाकिस्तान झिंदाबाद, असा स्टेटस लावलेल्या एका शिक्षकावर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसानी त्याला ताब्यात घेतले आसून जावेद अहमद (मूळ रा.जम्मू ) असे त्याचे नाव आहे. कोल्हापूर- सांगली मार्गावरील अतिग्रे येथील एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये तो शिक्षक होता. त्याच्या या गैरप्रकारा नंतर शालेय प्रशासनाने त्याची तात्काळ हकालपट्टी केली आहे.
देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना एका शिक्षकाने देशद्रोही कृत केल्याने परिसरामध्ये संतापाची लाट पसरली आहे. संबंधित शिक्षक हा अतिग्रे येथील एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये इंग्रजी विषय शिकवत होता. तो शिक्षक अतिग्रे येथेच भाड्याने रहात होता. चौदा ऑगस्टच्या रात्री या शिक्षकाने १४ ऑगस्ट इनडिपेंड डे आणि पाकिस्तान झिंदाबादचा स्टेटस त्याच्या मोबाईलवर लावला. त्याचा हा स्टेटस स्कूलच्या विद्यार्थी आणि पालकानी वॉटस्अप गृपवर पाहिल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
यापूर्वी ५ ऑगस्ट रोजी या शिक्षकाने जम्मू - काश्मिर ब्लॅक डे असा डीपी ठेवला होता. सदरचा स्टेटस व्हायरल झाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख व स्थानिक गुन्हे शाखा पथक पोलिसांनी तात्काळ हालचाली करत या शिक्षकाला ताब्यात घेतले. या घटनेबाबत स्थानिक पोलीस मात्र अनभिन्न होते.
संबधीत शिक्षकावर वरिष्ठाच्या आदेशानंतर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दाखल गुन्ह्याची माहिती देण्यास पोलिसांकडून टाळाटाळ सूरू होती. या वादग्रस्त शिक्षकाविरुद्ध विद्यार्थी व पालकांनी प्राचार्य व संस्था चालकांकडे तक्रार दाखल केली आहे. या शिक्षकाची शालेय प्रशासनाने तात्काळ हाकालपट्टी केली आहे.