मुख्यमंत्र्यांना डिवचलं, कोल्हापुरातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

By विश्वास पाटील | Published: June 12, 2024 02:24 PM2024-06-12T14:24:15+5:302024-06-12T14:27:20+5:30

कोल्हापूर : ताराराणी चौक ते दाभोळकर कॉर्नर चौक मार्गावर पादचारी पुलावर विनापरवानगी फलक लावून शहर विद्रूप केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी ...

A case has been registered against Youth Congress office-bearers in Kolhapur for putting up billboards without permission | मुख्यमंत्र्यांना डिवचलं, कोल्हापुरातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुख्यमंत्र्यांना डिवचलं, कोल्हापुरातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : ताराराणी चौक ते दाभोळकर कॉर्नर चौक मार्गावर पादचारी पुलावर विनापरवानगी फलक लावून शहर विद्रूप केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी युवक काँग्रेसच्या पदाधिका-यांवर गुन्हा दाखल केला.

दक्षिण विधानसभा मतदार संघातील युवक काँग्रेसचा अध्यक्ष मयूर मल्लिकार्जून पाटील (रा. मोरेवाडी, ता. करवीर), सरचिटणीस विशविक्रम कांबळे (रा. राजेंद्रनगर) आणि सोमराज सावंत (रा. महाडिक कॉलनी, कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत सहायक फौजदार सुनील महादेव जवाहिरे यांनी फिर्याद दिली.

लोकसभा निवडणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आम्ही टोल घालवला, तो आणला होता ज्यांनी त्या बंटी पाटील यांची या निवडणूकीत घंटी वाजवा असे आवाहन केले होते. त्याचा संदर्भ घेवून युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घंटी कशी वाजवली अशी विचारणा करणारा फलक दाभोळकर कॉर्नरला लावून थेट मुख्यमंत्र्यांनाच डिवचले होते. त्याची दखल घेवून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Web Title: A case has been registered against Youth Congress office-bearers in Kolhapur for putting up billboards without permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.