शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Kolhapur: ..अखेर न्यूटन एंटरप्रायजेसच्या अजिंक्य पाटीलवर गुन्हा; बनावट परवान्याने सीपीआरला सर्जिकल साहित्य पुरवठा

By विश्वास पाटील | Published: March 25, 2024 12:30 PM

'सीपीआरला बनावट परवान्याने औषध पुरवठा' असे सर्वात प्रथम या फसवणूकीचे वृत्त देवून या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता.

कोल्हापूर : बनावट परवान्याद्वारे सीपीआरला सर्जिकल साहित्याचा पुरवठा करणाऱ्या न्यूटन एंटरप्रायजेस या कंपनीचे मालक अजिंक्य अनिल पाटील (रा.राम गल्ली, त्रिमुर्ती कॉलनी कळंबा कोल्हापूर) शनिवारी (दि.२३) रात्री अकरा वाजता अखेर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला. लोकमतने १ फेब्रुवारी २०२४ ला सीपीआरला बनावट परवान्याने औषध पुरवठा असे सर्वात प्रथम या फसवणूकीचे वृत्त देवून या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता.यासंदर्भातील फिर्याद अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी मनोज अय्या यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत दिली. त्याचा गुन्हा रजिस्टर क्रमांक १४८- २०२४ असून भांदविस कलम ४०९ (सरकारी यंत्रणेची फसवणूक), ४२० (फसवणूक), ४६५(बनावट कागदपत्रे तयार करणे), ४६८ (तोतयेगिरी) आणि ४७१ (तोतयेगिरी करून फसवणूक) या कलमान्वये गुन्हा दाखल झाला.अजिंक्य पाटील याने हेदवडे (ता.भुदरगड) येथील शरद पांडुरंग वैराट यांच्या नावे मंजूर असलेल्या मे शौर्य मेडिकल ॲन्ड डिस्ट्रीब्यूटर्सच्या नावे असलेला मूळ परवानाच्या इंटीमेशन लेटरच्या नाव व पत्यामध्ये खोटारडेपणाने बदल केला. अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचा बनावट व खोटा शिक्का तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त अश्विन केशवराव ठाकरे यांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर करून शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने मे. न्यूटन एंटरप्रायजेस कोल्हापूर या दूकानाचे खोटे व बनावट इंटीमेशन लेटर तयार करून ते खरे आहे असे भासवून त्याद्वारे सीपीआर जिल्हा रुग्णालयास औषधे व सर्जिकल साहित्य पुरवठा करण्याची निविदा मंजूर करून त्याद्वारे तब्बल ५ कोटी १७ लाख ६३ हजार ४४० रुपयांचे सर्जिकल साहित्याचा पुठवठा केला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते जयराज कोळी यांनीही या प्रकरणाचा पाठपुरावा केला. स्वत: शरद वैराट यांनी भुदरगड, लक्ष्मीपुरी आणि पोलिस अधिक्षकांच्याकडे लेखी तक्रार देवूनही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात होती.

अजिंक्य पाटीलवर कणकवलीसह दोन पोलिस ठाण्यात गुन्हे..संशयित आरोपी अजिंक्य पाटील याच्यावर यापूर्वी दोन पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिसांत त्याच्यावर सीआरपीसी ४५१,४५७ तसेच भांदविस ४९८ अ, ४५२,४२७,३२३,५०४,५०६,३४य२१ प्रमाणे तर कणकवली पोलिस ठाण्यात भांदविस २७९, ३३७, मोवाकाक १८४, १८४, सी, १९२ अ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस