कणेरी : करवीर तालुक्यातील गोकुळशिरगाव येथे गोकुळ कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ येथे सुरु असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई केली. याप्रकरणी २४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कमेसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला.याबाबत माहिती अशी की, अर्जुन महादेव मिठारी यांच्या मालकीचे गोकुळ शिरगाव गावचे हद्दीतील ग्रामपंचायत मिळकत क्रमांक ७८३ या इमारतीच्या पहिला मजल्यावर गोकुळ कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आहे. येथे जुगार अड्डा सुरु होता. पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून रोख २ लाख ०८ हजार ७७० रुपये व ४ लाख ३८ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर, याप्रकरणी २४ जणांवर गुन्हा दाखल केला. मात्र काही वेळाने त्यांना सोडून देण्यात आले.ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, सहायक फौजदार हरीश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश पाटील, संजय पडवळ, संदीप कुंभार, अर्जुन बंद्रे, संतोष पाटील, राजेंद्र वरंडेकर, आदींनी केली. याबाबत फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सोमराज माणिकराव पाटील यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दिली.गुन्हा दाखल झालेल्यांची नावे - या प्रकरणी विजय सतीश घळके (रा. कणेरी), गणेश नागेश पाटील (वय २५, रा. दौलत नगर, कोल्हापूर), अभिनंदन आनंदा पाटील (३१ रा. गोकुळ शिरगाव), शिवाजी गणपती शिरगांवे (३२ रा. कंदलगाव), शिवाजी रामचंद्र पाटील (६२, रा. सावर्डे), नागेश शामराव शेळके (४४, रा. कणेरीवाडी), आनंदा विलास आरते (४८, रा.वडणगे), संभाजी शंकर निर्मळे (४९, रा. कंदलगाव), संजय वसंत वाकळे (५०, रा. नेर्ली), संजय सदाशिव पाडळीकर (५४, रा. उचगाव), चंद्रकांत विश्वनाथ गडहिरे (५२, रा. राजेंद्र नगर, कोल्हापूर), अविनाश ज्ञानोबा घोळवे (३७, रा. निप्पाणी वेस कागल), विकास आनंदराव सूर्यवंशी (४६, रा. खरी कॉर्नर शिवाजी पेठ कोल्हापूर), प्रताप हिंदुराव नागराळे (४५, रा. चिकोडी),
दादासो अंबादास माने (५१, रा. उचगाव), कैलास महादेव खिलारे (३७, रा. आगाशिव नगर कराड, जिल्हा सातारा), दत्तात्रय गजानन काटकर (३८ रा. पोर्ले), जिगनू सरवर वाठुंगे (रा. मोरेवाडी, कोल्हापूर), अलाउद्दीन रसूल नायकवडी (६६ रा. शिरोली पुलाची, कोल्हापूर), रवींद्र महादेव चव्हाण (३६, रा. राजारामपुरी कोल्हापूर), नितीन बाबुराव मर्दाने (४७, रा. गुरुवार पेठ कागल), संतोष बाजीराव वारके (५३, रा.मारुती मंदिर जवळ कणेरीवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर), मुकेश नवलकिशोर सिंग (४१ रा. कणेरी), अर्जुन महादेव मिठारी (रा.गोकुळ शिरगाव).