शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-गोवा महामार्गाची गडकरींनी दिली नवी तारीख; म्हणाले, सर्व खटले मिटले...
2
युट्यूबर पत्नीला तिच्या सहकारी युट्यूबरसोबत नको त्या अवस्थेत पाहिले...; लगेचच तिने बाजुला पडलेली ओढणी...
3
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार, कॉलही करणार; MPSC विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर शरद पवार काय म्हणाले?
4
हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादमध्ये मुलांनी बॉल समजून उचलला बॉम्ब, स्फोटात दोन मुले जखमी
5
गुगल आपले डोमेन बदलणार, तुमच्या ब्राऊझरच्या अ‍ॅड्रेस बारवर हे दिसणार...; घाबरू नका, पण सावध रहा...
6
५५ हजारांवर येण्याचं स्वप्न भंगलं; एका दिवसात सोन्याच्या दरात १३०० रुपयांपेक्षा अधिक वाढ, नवे दर काय?
7
Kitchen Tips: फळं खरेदी करताना ती आंबट आहेत की गोड, हे ओळखण्याच्या 'खास' टिप्स!
8
उपमुख्यमंत्री अजित पवारांना कार्यक्रमाला बोलावणार? गोपिचंद पडळकरांनी स्पष्टच सांगितलं...
9
मुलीने मारला वडिलांच्याच घरावर डल्ला, नवऱ्याच्या मदतीने चोरले ९० लाख; एका चुकीने पर्दाफाश
10
मुलींकडील आयपॅड काढून घेतले, अभ्यास करायला सांगितले, आईची थेट तुरुंगात रवानगी, पोलिसांनी केली कारवाई 
11
IPL 2025 मध्ये फिक्सिंगचा प्रयत्न सुरू, खेळाडूंच्या कुटुंबीयांना केलं जातंय टार्गेट, मास्टरमाइंड कोण?
12
"आज आम्ही भोगतोय, वेळ बदलेल तेव्हा…’’ EDच्या चौकशीला हजर झालेल्या रॉबर्ट वाड्रांचं सूचक विधान   
13
"मुर्शिदाबादचा हिंसाचार सुनियोजित कट, घुसखोरांना का येऊ दिलं गेलं?"; ममतांचा सवाल
14
धमाल! आता WhatsApp वर तुम्ही ठेवू शकता मोठं स्टेटस; १ मिनिटाची लिमिट कितीने वाढवली?
15
आयएमएचा डॉ घैसासांना पाठिंबा! ही बाब अत्यंत खेदजनक, अमित गोरखेंची टीका
16
डीअर क्रिकेट, गिव्ह मी वन मोअर चान्स! क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या करुण नायरची गोष्ट
17
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' स्टॉक, झुनझुनवालांकडे आहेत १३ कोटींपेक्षा अधिक शेअर; किंमत ₹९५ पेक्षा कमी 
18
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीपासून ॐकार साधना सुरू करा आणि अगणित लाभ मिळवा!
19
१०० कोटींची ऑर्डर! "१२०० फूट खोल खाणीत...", मुलीला शेवटचा मेसेज, लक्ष्मण शिंदेंची अपहरण करून हत्या
20
तुम्हाला श्रीमंत बनवणाऱ्या SIP चे १० सीक्रेट; कोट्यधीश होण्याचे गणित समजून घ्या

Kolhapur: जोतिबाच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वीच काळाचा घाला, पंचगंगेत बुडून कर्नाटकातील भाविकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 11:52 IST

कोल्हापूर : जोतिबाच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वी पंचगंगा नदीत अंघोळ करताना शंकर जालिंदर गवळीकर (वय ३२, रा. मिरकल, ता. बसवकल्याण, जि. ...

कोल्हापूर : जोतिबाच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वी पंचगंगा नदीत अंघोळ करताना शंकर जालिंदर गवळीकर (वय ३२, रा. मिरकल, ता. बसवकल्याण, जि. बिदर, कर्नाटक) याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. ६) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. अग्निशामक दलाच्या जवानांसह जीवरक्षक उदय निंबाळकर यांनी शोध घेऊन मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.पंचगंगा नदीघाटावरून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील मिरकल येथून ९ तरुण जोतिबाच्या दर्शनासाठी आले होते. रविवारी पहाटे कोल्हापुरात पोहोचताच ते अंघोळीसाठी पंचगंगा नदीघाटावर गेले. अंघोळ करून ते देवदर्शनासाठी जोतिबा डोंगरावर जाणार होते. तत्पूर्वी पाण्यात उतरलेला शंकर गवळीकर हा बुडाला. त्याला पोहता येत होते. नदीपात्रात मध्यावर जाऊन आल्यानंतर तो पुन्हा पाण्यात उतरताच बुडाला.याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेऊन शोध सुरू केला. दोन तासांच्या शोधमोहिमेत मृतदेह सापडला नाही. अखेर जीवरक्षक उदय निंबाळकर यांनी सकाळी सातच्या सुमारास मृतदेह शोधून पाण्यातून बाहेर काढला. सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी करून मृतदेह मित्रांच्या ताब्यात देण्यात आला. शंकर गवळीकर हा गवंडीकाम करीत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, चार भाऊ असा परिवार आहे.देवदर्शनाविनाच परतलेरात्रभर प्रवास करून पहाटे कोल्हापुरात पोहोचलेले तरुण अंघोळीनंतर देवदर्शनासाठी जोतिबा डोंगरावर जाणार होते. त्यानंतर अंबाबाईचे दर्शन घेऊन गावाकडे जाणार होते. मात्र, शंकरचा बुडून मृत्यू झाल्याने देवदर्शनाविनाच त्यांना परत जावे लागले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबाdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूKarnatakकर्नाटक