शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

Kolhapur News: शेतात नांगरट करताना बसला विजेचा धक्का, शेतकरी जागीच ठार; महावितरणच्या गलथान कारभार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2023 12:40 PM

दोषींवर कठोर कारवाई करा

चंदगड : शेतात नांगरट करताना शाॅक लागून तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुक्कीहाळ (ता. चदगड) येथे शुक्रवारी दुपारी घडली. संतोष सुरेश बच्चेनट्टी (वय २१) असे मृत युवकाचे नाव आहे. घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर यांनी येऊन घटनेचा पंचनामा केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे म्हणत कार्यकारी अभियंत्यासह महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी अडवून धरल्यामुळे रात्री उशिरापर्यंत गावात वातावरण तणावग्रस्त बनले होते.शुक्रवारी सकाळी संतोष बैलजोडी घेऊन शेतात नांगरणी करण्यासाठी गेला होता. नांगरणी सुरू असताना नांगराचा फाळ खांबाच्या ओढणीला लागला असता त्यामधील विजेचा शॉक त्याला लागला. हा धक्का इतका तीव्र होता की, दुर्दैवी संतोष बेशुद्ध पडला. त्याला उपचारासाठी कोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले, पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मतदेह चंदगडला पाठविला. ही माहिती समजताच गावात तणावपूर्ण वातावरण बनले. त्यामुळे ग्रामस्थांची समजूत काढायला गेलेल्या कार्यकारी अभियंता विशाल लोदींसह कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले. इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर यांनी येऊन पंचनामा केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेऊन त्यांना अडवून धरले. त्यानंतर पैलवान विष्णू जोशिलकर, नरसिंग बाचूळकर, जनार्दन देसाई यांनी ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही.

त्यानंतर रात्री उशिरा इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर युवराज वाघ व त्यांच्या पथकाने पंचनामा केल्यामुळे वातावरण निवळले. रात्री उशिरा संतोषवर अंत्यसंस्कार करण्यात आले. संतोष हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे.दोषींवर कठोर कारवाई कराघटनेची माहिती आमदार राजेश पाटील व शिवसेनेचे राजू रेडेकर यांना समजताच घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी सूचना कार्यकारी अभियंता विशाल लोदी यांना दिल्यावर वातावरण थोडे निवळले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandgad-acचंदगडFarmerशेतकरीelectricityवीजDeathमृत्यू