शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

Kolhapur: इच्छुक ढीगभर, यादी जाहिर झाल्यावरच लढतीचे 'उत्तर'; राजेश क्षीरसागरांना कोण आव्हान देणार ही उत्सुकता

By भारत चव्हाण | Updated: October 18, 2024 16:42 IST

काँग्रेसकडून एक नवीन, आक्रमक व क्षमता असलेला उमेदवाराचा शोध

भारत चव्हाणकोल्हापूर : ‘कोल्हापूर उत्तर’ मतदारसंघातील उमेदवारीसाठी महाआघाडीच्या काँग्रेस, उद्धवसेनेत जेवढी चढाओढ आहे तेवढीच ती महायुतीतील भाजप, शिवसेनेतही (शिंदेसेना) आहे. हे सगळे चित्र येत्या दोन-तीन दिवसांत स्पष्ट होणार असले तरी प्रत्यक्ष लढत शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी होईल, असे दिसते. त्यामुळे शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात कोण? एवढीच उत्सुकता लागून राहिली आहे.या मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेस यांचेच वर्चस्व राहिले आहे. मात्र, शिवसेनेला भाजपची, तर काँग्रेसला राष्ट्रवादीची मदत मिळते हेही विसरून चालणार नाही. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे गट पडल्याने कोणाची किती ताकद चालणार हे निकालानंतरच कळणार आहे. लढते कोण? याबरोबरच इच्छुक असलेले उमेदवारी न मिळाल्यास काय भूमिका घेतात, यावरही लढतीतील चुरस अवलंबून असेल.शिंदेसेनेकडून राजेश क्षीरसागर, भाजपकडून सत्यजित कदम, महेश जाधव, अजित ठाणेकर यांनी उमेदवारी मागितली आहे. काँग्रेसकडून आमदार जयश्री जाधव, सचिन चव्हाण, राजू लाटकर, वसंत मुळीक, शारंगधर देशमुख यांनी, तर उद्धवसेनेकडून संजय पवार, रविकिरण इंगवले यांनी उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडून व्ही. बी. पाटील इच्छुक आहेत. हा मतदारसंघ उद्धवसेनेला मिळावा म्हणूनही आग्रह धरला जात आहे.क्षीरसागर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित असल्याचे मानले जाते. त्याआधी भाजपला आपला हक्क सोडावा लागेल. मग सत्यजित कदम काय करणार हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. काँग्रेसकडून ज्यांनी ज्यांनी उमेदवारी मागितली आहे, त्यांच्या निवडून येण्याच्या क्षमतेवर पक्षनेतृत्वाचाी शंका आहे. म्हणून काँग्रेसकडून एक नवीन, आक्रमक व क्षमता असलेला उमेदवाराचा शोध सुरू आहे.त्यातूनच मधुरिमाराजे यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. शाहू छत्रपती यांनी नुकतीच लोकसभेची निवडणूक जिंकली असल्याने पुन्हा त्यांच्याच घरातील व्यक्ती आमदारकीची निवडणूक लढविण्यास तयार होईल, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. काँग्रेसचा आग्रह असला तरी तशी छत्रपतींची मानसिक तयारी दिसत नाही. 

२०२२ ची पोटनिवडणूक

  • जयश्री जाधव (काँग्रेस) - ९६ हजार १७६
  • सत्यजित कदम (भाजप) - ७७ हजार ४२६

 

  • पुरुष मतदार - १,४८,१३०
  • महिला मतदार - १,५२,०१९
  • एकूण मतदार - ३,००,१६६
टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरBJPभाजपा