शहरं
Join us  
Trending Stories
1
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
2
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
3
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
4
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
5
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
6
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
7
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
8
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
9
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
10
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
11
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
12
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
13
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
14
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
15
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
17
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
18
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
19
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
20
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...

Kolhapur: दीडपटचे आमिष, उचगाव येथील सराफाला दोन कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 3:50 PM

कोल्हापूर : सोने आणि रोख रक्कम गुंतवणूक केल्यास सहा महिन्यांत दीडपट करून देण्याचे आमिष दाखवून उचगाव (ता. करवीर) येथील ...

कोल्हापूर : सोने आणि रोख रक्कम गुंतवणूक केल्यास सहा महिन्यांत दीडपट करून देण्याचे आमिष दाखवून उचगाव (ता. करवीर) येथील एका सराफ व्यावसायिकांसह काही लोकांना सुमारे २ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणूक झालेल्या सराफाने कोल्हापूरच्यापोलिस अधीक्षकांकडे आणि गांधीनगर पोलिस ठाण्यातही तक्रार दिली आहे. ऑगस्ट २०२२ ते २०२३ या काळात ही फसवणूक झाली आहे.शंकर नाना मुसळे यांच्या ओळखीतून रियाज मुरसल (रा.मणेर मळा, भोसले पेट्रोल पंपासमोर उचगाव ता.करवीर) यांनी ही फसवणूक केल्याचे तक्रारदार स्वप्निल सूर्यकांत पोरे (रा. उजळाई कॉलनी सरनोबतवाडी ता.करवीर) यांनी म्हटले आहे. तक्रारीतील तपशील असा : पोरे यांचे स्वाती ज्वेलर्स नावाचे घराजवळच ५-६ वर्षांपासून सराफ दुकान आहे. हे दुकान भाड्याच्या गाळ्यात असून त्या गाळामालकाचे नाव शंकर मुसळे आहे. त्यातून पोरे यांचे त्यांच्याशी संबंध निर्माण झाले. मुसळे यांनी त्यांना वेगवेगळ्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देऊ शकतो, असे आश्वासन दिले. तुमच्या दोघांची समाजात चांगली ओळख आहे. त्यातून लोकांकडून पैसे घ्या, त्या गुंतवणुकीची जबाबदारी आम्ही घेतो, असा दावा मुरसल याने केल्याने मित्र नातेवाईक, नेहमीचे ग्राहक यांच्याकडून रक्कम घेऊन मुरसल यांच्याकडे गुंतवणूक केली. सहा-सात महिन्यांनंतर गुंतवणूक केलेल्या रकमेचा परतावा मागितला असता मी गुंतवलेल्या ठिकाणी माझे नुकसान झाले आहे, असे सांगून मुरसल याने उडवाउडवीची उत्तरे दिली व वेळ मारून नेली. ही गुंतवणूक मुसळे यांच्या सांगण्यावरून केली आहे. परंतु त्यांनी आता हात वर केले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस