शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
2
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
3
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
4
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
5
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
6
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
8
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
9
शायना एनसींना इम्पोर्टेड माल म्हटल्याबद्दल अरविंद सावतांनी मागितली माफी; म्हणाले, "जाणूनबुजून मला..."
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत महायुतीला मोठा दिलासा! सम्राट महाडिकांचा यू-टर्न, अपक्ष अर्ज माघार घेणार; सत्यजीत देशमुखांचा प्रचार करणार
11
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग
12
Bad Luck! कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की!
13
कॅनडाचे जस्टीन ट्रुडो सरकार सुधरेना! भारताचा 'सायबर धोकादायक' देशांच्या यादीत केला समावेश
14
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
16
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!
17
विना गॅरेंटी इतक्या कमी व्याजावर मिळेल ३ लाखांपर्यंतचं कर्ज; पाहा काय सरकारची PM Vishwakarma योजना
18
दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी
19
Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव
20
Girish Mahajan : संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान

जोतिबा विकासासाठी एक हजार कोटींचा विकास आराखडा, अर्थसंकल्पात निधीची तरतूद होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 1:32 PM

जोतिबा देवाच्या कोणकोणत्या जिल्ह्यात किती जमिनी आहेत याचा सध्या देवस्थान समिती शोध घेत आहे

कोल्हापूर : वाडी रत्नागिरी येथील जोतिबा मंदिर परिसर विकासासाठी एक हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी करण्यात येत असलेल्या प्राधीकरणच्या नियमावलीचा मसुदाही आता तयार झाला असून येत्या अर्थसंकल्पामध्ये यासाठी निधीची तरतूद होण्याची शक्यता आहे.जोतिबा मंदिर व परिसराच्या विकासासाठी प्राधीकरण करण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानंतर आमदार विनय कोरे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांना प्राधीकरणाचा कच्चा मसुदा तयार करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार नाईकवाडे यांनी प्राधीकरणाची नियमावली व मसुदा तयार केला आहे. प्राधीकरणाअंतर्गत जोतिबा डोंगरासह आसपासच्या २५ गावांचाही विकास करण्यात येणार आहे. त्यात वाघबीळ ते कासारवाडीपर्यंतच्या गावांचा समावेश आहे.अख्खा जोतिबा डोंगर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारित आहे. इतर जमिनी या शासकीय गायरान, वनखात्याच्या अखत्यारित आहे. त्यामुळे प्राधीकरणामध्ये देवस्थान समितीसोबतच महसूल, कृषी, वन, सार्वजनिक बांधकाम अशा संबंधित सर्व खात्यांच्या सहभागातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती व राजकीय नेत्यांची समिती असे दोन समित्या करण्याचे नियोजन आहे.या प्राधीकरणाचा मसुदा आता तयार झाला असून तो मंजुरीसाठी प्रस्तावित आहे. त्याला मान्यता मिळाली की अर्थसंकल्पीय अधिवेशनात तो मांडला जाऊन त्यासाठी निधीची तरतूद होण्याची शक्यता आहे.

आराखड्यातील समाविष्ट बाबीभाविकांसाठी अन्नछत्र, यात्री निवास त्यासाठी स्वतंत्र न्यासाची स्थापना. अकरा मारुती, नगर प्रदक्षिणा मार्गाचा विकास. जोतिबा ते पन्हाळा रोप वे, हरितपट्टा, जंगल संवर्धन, सामाजिक वनीकरण.

जमिनींच्या शोधासाठी तहसीलदारांना पत्रजोतिबा देवाच्या कोणकोणत्या जिल्ह्यात किती जमिनी आहेत याचा सध्या देवस्थान समिती शोध घेत आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांतील प्रांताधिकारी व तहसीलदारांना पत्र पाठवून याबाबतची माहिती देण्याची विनंती करण्यात आली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा