शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सोशल मीडियावर लिंक पाठवून कोल्हापुरातील निवृत्त शिक्षिकेला ५९ लाखांना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 13:58 IST

परतावाही नाही, अकौंटही बंद

कोल्हापूर : फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामवर लिंक पाठवून त्या माध्यमातून अॅप डाऊनलोड करण्यास सांगून २० टक्के डिस्काऊंटवर शेअर्स देण्याच्या बहाण्याने येथील निवृत्ती शिक्षिकेची तब्बल ५८ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले. याबाबत सुनीता विद्याधर गाट (रा. बापट कॅम्प) यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री फिर्याद दिली. १९ एप्रिल ते ३० मे २४ या कालावधीत टप्प्याटप्प्याने ही फसवणूक करण्यात आली आहे.भारतीय दंडविधान संहिता कलम ४०६,४२०,३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९३ ३,४ प्रमाणे आरोपी नरेश डी. जडेजा व शिवांगी अगरवाल पूर्ण पत्ता माहीत नाही यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी सांगितले, जडेजा आणि अगरवाल यांनी फेसबुक व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामवर MSFL या कंपनीची खोटी जाहिरात देऊन लिंकही शेअर करण्यात आली.यानंतर त्यावरून त्यांच्या एमएसएफएल कनेक्ट (A७७७) या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड होण्यास सांगून, त्यावर ब्लॉक ट्रेडिंग तसेच आयपीओबद्दल माहिती सांगितली. या व्यवहारातून तुम्हांला १० ते २० टक्के डिस्काउंटवर शेअर्स मिळतील व त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होईल असे आमिष दाखवले.एकदा का विश्वास संपादन केला की मग त्या दोघांनी या व्हॉट्सॲप ग्रुपवर शिवांगी ७७७ ही टेलिग्राम लिंक पाठवून त्यावरून एमएसएफएल हे ॲप डाउनलोड करायला सांगितले व एमएसएलएफ ऑनलाइन ३३ ही लिंक पाठवून त्यावरून वरीलप्रमाणे विविध बँक अकाउंटची माहिती देऊन त्यांच्या बँक अकाउंटवर वेळोवेळी गाट यांना ५८ लाख ६३ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार हे पैसे भरण्यात आले.

परतावाही नाही, अकौंटही बंद

मे २०२४ च्या अखेरपर्यंत हे पैसे भरण्यात आले. परंतु नंतर परतावाही बंद झाला आणि अकौंटही बंद झाले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे गाट यांच्या लक्षात आले. याबाबत वेगवेगळ्या पातळ्यांवर त्यांच्या कुटुंबीयांनी चौकशी केली. माहिती घेतली. परंतु कुठूनच याबाबत पैसे परत मिळण्याची शक्यता मावळल्याने अखेर त्यांनी पोलिसात धाव घेतली.

मोबाइल कधीही बंद होऊ शकतोअशी फसवणूक करणारी माणसे आपला मोबाइल कधीही बंद करू शकतात. हे वास्तव ध्यानात न घेता एखाद्याचा मोबाइल आपल्याकडे आहे म्हटले की माणूस विश्वासाने व्यवहार करतो. परंतु समोरच्याने फोनच उचलला नाही, कट केला, बंद करून टाकला तर काय करणार, याचा सारासार विचार होत नाही आणि मग अशा फसवणुकीला बळी पडावे लागते. ज्यांचा नेमका पत्ताच माहिती नाही अशांशी सवलतीच्या शेअर्सच्या मोहाने केलेला व्यवहार या शिक्षिकेला महागात पडला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमTeacherशिक्षक