शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

ए. एस. ट्रेडर्सच्या एजंटवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा, मूळ रक्कम परत मागणाऱ्या गुंतवणूकदारास शिवीगाळ 

By उद्धव गोडसे | Published: March 15, 2023 7:13 PM

कोल्हापूर : ए. एस. ट्रेडर्सकडून गुंतवणुकीवरील परतावा थांबल्यानंतर मूळ रक्कम परत मागणाऱ्या गुंतवणूकदारास एजंट दाम्पत्याने जातीवाचक शिवीगाळ आणि धक्काबुक्की ...

कोल्हापूर : ए. एस. ट्रेडर्सकडून गुंतवणुकीवरील परतावा थांबल्यानंतर मूळ रक्कम परत मागणाऱ्या गुंतवणूकदारास एजंट दाम्पत्याने जातीवाचक शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. हा प्रकार तीन मार्चला फुलेवाडी रिंगरोड येथे शिवदत्त कॉलनीत घडला.

याबाबत पूजा सागर शिंदे (वय २७, रा. गंगाई लॉन, फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, रमेश चौगुले (पूर्ण नाव नाही) आणि अश्विनी रमेश चौगुले (दोघेही रा. शिवदत्त कॉलनी, फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.फिर्यादी शिंदे यांनी ए. एस. ट्रेडर्स कंपनीचा एजंट रमेश चौगुले याच्याकरवी कंपनीत ३० लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. सुरुवातीचे काही महिने त्यांना परतावा मिळाला. त्यानंतर मात्र परतावा थांबल्याने मूळ गुंतवलेली रक्कम परत मिळावी, अशी मागणी शिंदे यांनी एजंटकडे सुरू केली. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून त्या एजंटकडे पैसे मागत आहेत. मात्र, उडवाउडवीची उत्तरे देऊन एजंटकडून टाळाटाळ सुरू आहे.

तीन मार्चला त्या एजंटच्या घरी जाऊन गुंतवलेली रक्कम परत मागत होत्या. त्यावेळी एजंट रमेश चौगुले याने शिंदे यांना जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच अश्विनी चौगुले हिने धक्काबुक्की करीत मारण्याची धमकी दिली. याबाबत शिंदे यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी यांच्याकडून गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस