शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

ए. एस. ट्रेडर्सने ८२ हजार गुंतवणूकदारांना तीन हजार कोटींचा लावला चुना, व्यवहारांमध्ये गंभीर त्रुटी

By उद्धव गोडसे | Published: May 05, 2023 12:48 PM

शासकीय यंत्रणांची दिशाभूल

उद्धव गोडसेकोल्हापूर : ए. एस. ट्रेडर्सने अल्पावधीत पश्चिम महाराष्ट्रासह सीमाभाग आणि विदर्भातही कंपन्यांचा विस्तार वाढवला होता. सुमारे ८२ हजार गुंतवणूकदारांनी विविध योजनांमध्ये १ हजार २३१ कोटी रुपये गुंतवले, तर ए. एस. टोकणमध्ये १८०० कोटी रुपये गुंतवले. अवघ्या पाच वर्षांत ए. एस.च्या संचालकांनी ८२ हजार गुंतवणूकदारांना तीन हजार कोटींचा गंडा घातल्याचे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे.ए. एस. ट्रेडर्सच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली, तेव्हा फिर्यादी रोहित सुधीर ओतारी यांच्या जबाबात फसवणुकीची रक्कम ४ कोटी ८९ लाख ७२ हजार ६४९ रुपये असल्याचा उल्लेख केला होता. तपासादरम्यान या गुन्ह्याची व्याप्ती खूपच मोठी असल्याचे समोर आले. २०१७ मध्ये सुरू झालेल्या ए. एस. ट्रेडर्स कंपनीद्वारे लोहितसिंग सुभेदार, अमर चौगुले, बाबूराव हजारे, विजय पाटील, भिकाजी कुंभार, निसार मुल्ला आणि अमित शिंदे यांनी साथीदारांना हाताशी धरून गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपयांची माया जमा केली. नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक आणि काही राजकीय व्यक्तीच्या नावांचा वापर करून त्यांनी गुंतवणूकदारांना आकर्षित केले. दुप्पट परताव्याचे आमिष, महागड्या भेटवस्तू, मोठ्या हॉटेल्समधील रंगारंग सेमिनार्स, देश-विदेशातील सहली याची भुरळ पडल्याने ८२ हजार गुंतवणूकदारांनी डोळे झाकून ए. एस. ट्रेडर्ससह संलग्न कंपन्यांमध्ये सुमारे तीन हजार कोटींची गुंतवणूक केली.सुुरुवातीचे काही महिने चांगला परतावा मिळाल्याने सर्वच गुंतवणूकदार खूश होते. आणखी मोठा फायदा मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांनी कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून, हातउसणे पैसे घेऊन, सावकारी कर्ज घेऊन ए. एस.मध्ये गुंतवणूक केली. आता मूळ गुंतवणूक अडकली असून, परतावे बंद आहेत. मुद्दल परत मिळेल की नाही, याची खात्री नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.शासकीय यंत्रणांची दिशाभूलशेतीशी संबंधित कंपन्यांना व्यवसाय कर, प्राप्तिकर, जीएसटी कमी आहे. हीच बाब लक्षात घेऊन ए. एस.च्या संचालकांनी शासन दरबारी कंपन्यांची नोंदणी करताना दिशाभूल केली. शेतीपूरक व्यवसाय असल्याचे कागदोपत्री दाखवून या कंपन्यांनी कर चुकवेगिरी केली. याबाबत जबाबदार शासकीय यंत्रणांनी ए. एस. ट्रेडर्स आणि ट्रेडविंग्ज कंपनीला फटकारल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुरावे लपविण्याची धडपड

गुन्हे दाखल होताच ए. एस.च्या संचालकांनी पुरावे लपविण्याची धडपड केली. कंपनीच्या कार्यालयांमधील महत्त्वाची कागदपत्रे, बँक खात्यांचे तपशील, संगणकांमधील हार्डडिस्क लांबवल्या. तपास अधिकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने सायबरतज्ज्ञांच्या मदतीने माहिती मिळवली. यामुळेच गुंतवणूकदारांची संख्या आणि गुंतवणुकीची रक्कम समोर आली.गडहिंग्लजमधील शिक्षक दाम्पत्याचे ४५ लाख अडकलेगडहिंग्लज तालुक्यातील एका शिक्षकाने कोजिमाशीमधून २० लाख, तर प्राथमिक शिक्षिका असलेल्या त्यांच्या पत्नीने शिक्षक बँकेतून २५ लाख रुपयांचे कर्ज काढून ए. एस.मध्ये ४५ लाखांची गुंतवणूक केली होती. त्यांना परताव्याचे केवळ पाच हप्ते मिळाले. आता बँकांचे हप्ते भरण्यासाठी पुन्हा कर्ज काढण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. विशेष म्हणजे, एका मित्राने गरजेच्या वेळी या दाम्पत्याकडे उसणे दोन लाख मागितले होते. त्याला नकार देऊन दाम्पत्याने ए. एस.मध्ये पैसे गुंतवले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी