शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

Kolhapur: खासगी बस धावत्या कारवर आदळली, ३९ जण किरकोळ जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 5:04 PM

धोकादायक वळणावर नियंत्रण सुटल्याने अपघात

पेठवडगाव : राष्ट्रीय महामार्गावरील मंगरायाचीवाडी फाट्याजवळ भरधाव खासगी बस धावत्या कारवर उलटल्याने दोन्ही वाहनातील ३९ जण किरकोळ जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास झाला. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. महामार्गावरील धोकादायक वळणावर नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातामुळे काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती.या अपघातात हर्षा आवल रेड्डी (वय ३२, मोशी, पुणे), जयश्री हर्षा रेड्डी (वय २९), मनोहर किसन वंजारी (वय ७२, रा.विश्रांतवाडी, आळंदी रोड, पुणे), तेजस मनोहर वंजारी, अशोकराव राखे यांना गंभीर दुखापत झाली आहे. इतर ३४ प्रवासी किरकोळ जखमी झालेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अधिक माहिती अशी, ऑरेंज ट्रॅव्हर्स (नं.ए.आर.०२;४६४८) बंगळुरूहून पुणेकडे ३४ प्रवासी घेऊन जात होते, तर कारमधून (एम.एच.१२,के.ई.३६२१) पाचजण पुण्यास निघाले होते. दरम्यान, क्लासिक पेट्रोल पंपाच्या पुढे मंगरायाचीवाडी फाट्याला महामार्गाचे रुंदीकरणाचे रस्त्याचे काम सुरू आहे. या जागी डिव्हायडरने रस्ता वळवलेला आहे. रस्त्याला उतार असल्यामुळे बस (ट्रॅव्हलर्स) भरधाव वेगाने जात होती. यावेळीमधील डिव्हायडर चालकाच्या लक्षात आला नाही. यामुळे त्याने वेगाने त्या डिव्हायडरवर बस चढली.यामध्ये धडकेमुळे बस उलटली आणि थेट धावत्या कारवर पडली. यावेळी बसमधील ३४ प्रवासी बसच्या आतल्या आत धडक होऊन जखमी झाले. प्रवाशांची आरडा-ओरड केला. अनेक प्रवाशांना डोक्यास, डोळ्यास मुक्का मार लागला. याशिवाय प्रवाशांचे साहित्य इतरत्र विस्कटले. दरम्यान, चालकाशेजारी बसलेले अशोकराव राखे हे बसमधून बाजूला पडल्याने दुखापत झाली.या घटनेची माहिती वडगाव पोलिसांना कळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक अनिता पवार, रियाज मुल्लाणी, पतंगराव रेणुसे, रामराव पाटील, महेश गायकवाड, अंजना चव्हाण यांनी तत्काळ मदत सुरू केली. जखमींना उपचारासाठी हलविले व वाहणे रस्त्यातून बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. दरम्यान, पोलिस येण्यापूर्वीच काही प्रवासी व नागरिकांनी मदत करून उपचारासाठी अत्यावश्यक रुग्णवाहिकेतून हलविले. कारमधील अडकलेल्यांना नागरिकांनी बाहेर काढले. सुदैवाने कारमधील पाचही प्रवासी बचावले. तपास पोलिस निरीक्षक विलास भोसले करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात