शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
2
लोकसभेला शब्द देऊनही अजित पवारांनी पुरंदरमध्ये उमेदवार दिला; विजय शिवतारे संतापले...
3
“PM मोदींना महाराष्ट्रात ७-८ सभा घ्याव्या लागतात, स्वाभिमानी जनतेचा हा विजय”; सुप्रिया सुळेंचा टोला
4
"अजित पवार जे बोलले, याचं दुःख आयुष्यभर राहिल"; सुप्रिया सुळेंनी सुनावलं
5
शिंदेंचा कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का! विद्यमान आमदार जयश्री जाधव शिवसेनेत
6
Gold Price on Diwali: दिवाळीत वाढली सोन्या-चांदीची चमक; खरेदीपूर्वी पाहा खिशावर किती भार पडणार?
7
अंतरवाली सराटीत निर्णायक बैठक; समीकरण जुळले तर गोरगरीब सत्तेत बसेल, जरांगेंची भूमिका
8
ऐन दिवाळीत पाकिस्तानात 'ग्रीन लॉकडाऊन'!, याचा नेमका अर्थ काय? असा निर्णय का घेतला?
9
दिवाळीला शिंदे-ठाकरे गटाचे उमेदवार एकत्र, सोबत केली विठुरायाची आरती
10
लग्नानंतर पहिली दिवाळी एकत्र साजरी करण्यापूर्वीच कपलसोबत आक्रित घडलं अन् सारचं संपलं
11
“४४ वर्षे निष्ठेने काम केले, पण तिकीट नाकारले”; काँग्रेस नेते फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात
12
वळसे पाटलांच्या पराभवासाठी काय करायला हवं?; निकमांच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा कानमंत्र
13
पुढील मुख्यमंत्री भाजपाचा, राज ठाकरेंच्या विधानावर CM एकनाथ शिंदे काय म्हणाले..?
14
प्रकाश आंबेडकर छातीत दुखू लागल्याने पहाटेच हॉस्पिटलमध्ये दाखल; अँजिओग्राफी होणार
15
कशी ठरते तुमची CTC; बेसिक सॅलरी, ग्रॉस सॅलरी आणि नेट सॅलरीत फरक काय? जाणून घ्या
16
“मनसे साथीने भाजपाचा CM होणार”; राज ठाकरेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
DC ला आली पहिल्या प्रेमाची आठवण? हेच असू शकतं पंतच्या 'ब्रेकअप' मागचं कारण 
18
'फॅन्ड्री'मधील जब्या आणि शालूने केलं लग्न ? मंडपातील फोटो व्हायरल
19
...म्हणून श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापलं, दीपक केसरकर यांनी नेमकं कारण सांगितलं
20
गुजरातमध्ये राष्ट्रीय एकता दिनी झळकला दुर्ग रायगड; पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिली प्रतिक्रिया

Kolhapur: नोकरी असतानाही क्लास घेणाऱ्या माध्यमिक शिक्षकांचे होणार स्टिंग ऑपरेशन 

By समीर देशपांडे | Published: October 11, 2023 2:22 PM

कोल्हापूर माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात नोकरी करतानाही खासगी क्लास घेणाऱ्या माध्यमिक शिक्षकांचे ‘स्टिंग ऑपरेशन’ करण्याचा निर्णय माध्यमिक शिक्षणाधिकारी ...

कोल्हापूर माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात नोकरी करतानाही खासगी क्लास घेणाऱ्या माध्यमिक शिक्षकांचे ‘स्टिंग ऑपरेशन’ करण्याचा निर्णय माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ .एकनाथ आंबोकर यांनी घेतला आहे. असोसिएशन ऑफ महाराष्ट्र कोचिंग क्लासेसच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी बुधवारी ही ग्वाही दिली.असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. आंबोकर यांची भेट घेऊन त्यांना दुसऱ्यांदा निवेदन दिले. २६ एप्रिल २००० ला महाराष्ट्र शासनाने काढलेल्या परिपत्रकात असे क्लासेस घेण्यास बंदी आहे. तरीही अनेक शाळा, महाविद्यालयांतील शिक्षक शाळा, महाविद्यालयांत शासनमान्य अनुदानित पगार घेत असताना स्वतंत्र खासगी क्लास कॉलेज, शाळेच्या जवळपास चालवतात. विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलच्या गुणांचे आमिष दाखवतात. याबाबत वेळोवेळी कॉलेजचे प्राचार्य, संस्थापक अध्यक्षांना व शिक्षण उपसंचालक यांच्याकडे रजिस्टर एडीने ४ ऑगस्ट रोजी तक्रारी केल्या आहेत. परंतु याबाबत कोणीही कारवाई न होता त्यांना पाठीशी घातले जात आहे, असे यावेळी चर्चेत सांगण्यात आले.चंद्रकांत यादव, प्रा. सुभाष देसाई, बी. एस. पाटील, अतुल निंगुरे, उदय शिपेकर, प्रकाश मोरे, संभाजी सावंत, रितेश दलाल, अमित निगवेकर, विद्यानंद उपाध्ये, नारायण निळपणकर, किरण मोळे यांनी डॉ. आंबोकर यांना यावेळी निवेदन दिले.

क्लासेसच्या पत्त्यासह दिली यादीकोचिंग क्लासेसच्या पदाधिकाऱ्यांनी ११ सप्टेंबर रोजी डॉ. आंबोकर यांना दिलेल्या निवेदनात ९ शिक्षकांची नावे घालून निवेदन दिले आहे. यात त्यांनी तक्ताच तयार केला असून, यामध्ये शाळा, महाविद्यालयांचे नाव, शिक्षकांचे नाव आणि क्लास घेत असलेला पत्ता अशी सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, नागाळा पार्कातील नामवंत शाळा, महाविद्यालयांतील शिक्षकांचा समावेश आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदTeacherशिक्षक