कोल्हापूर: जून, जुलै महिन्यात दमदार आगमन केल्यानंतर ‘सुट्टीवर’ गेलेला पाऊस परतत नसल्याने कोल्हापूरकरांना ऐन पावसाळ्यात ऑगस्टच्या अधिक महिन्यात जादाचा ‘उन्हाळा’ सहन करावा लागत आहे. पावसाचा अभाव आणि हवेतील बाष्पाचे अतिरिक्त प्रमाण यामुळे उकाडा कमालीचा वाढला आहे. काल, गुरुवारी काेल्हापूर शहरात पाऱ्याने २८ अंशांचा टप्पा गाठला. पावसाळ्यात २१ अंश सेल्सियस तापमान असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पाऱ्याने २८ अंशांची पातळी गाठली आहे. यामुळे बाहेर पडणाऱ्या नोकरदार महिला, नागरिकांना स्कार्फ, छत्री आणि टोपीचा आधार घ्यावा लागत आहे. जिल्ह्यात जुलै महिन्यात संततधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. नद्याचे पाणी पात्राबाहेर गेल्याने अनेक वाहतूक मार्ग बंद झाले होते. मात्र, गेल्या काही दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 5.1 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर राधानगरी धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.जिल्ह्यातील 7 बंधारे पाण्याखालीपंचगंगा नदीवरील - शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड. कासारी नदीवरील - यवलूज असे 7 बंधारे पाण्याखाली आहेत.पाटंबधारे विभागाच्या आजच्या नोंदीप्रमाणे बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 16.10 फूट, सुर्वे 19.3 फूट, रुई 45 फूट, इचलकरंजी 42.6, तेरवाड 39.9 फूट, शिरोळ 31.6 फूट, नृसिंहवाडी 31.3 फूट व राजापूर 16 फूट अशी आहे.
जिल्ह्यातील धरण पाणीसाठाधरणांचे नाव, आजचा पाणीसाठा आणि एकूण पाणीसाठा क्षमता (टीएमसीमध्ये) कंसामध्येराधानगरी - 8.17 (8.361 टी. एम. सी), तुळशी 2.68 (3.471 टी. एम. सी), वारणा 29.56 (34.399 टी. एम. सी), दुधगंगा 20.99 (25.393 टी. एम. सी), कासारी 2.63 (2.774 टी. एम. सी), कडवी 2.52 (2.516), कुंभी 2.43 (2.715 टी. एम. सी), पाटगाव 3.39 (3.716 टी. एम. सी), चिकोत्रा 1.29 (1.522 टी. एम. सी), चित्री 1.89 (1.886 टी. एम. सी), जंगमहट्टी 1.22 (1.223), घटप्रभा 1.48 (1.560), जांबरे 0.81 (0.820 टी. एम. सी ) आंबेओहोळ 1.24 (1.240 टी. एम. सी ), कोदे ल.पा. 0.21 (0.214 टी. एम. सी )
जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी हातकणंगले- 0.3 मिमी, शिरोळ - 0.1 मिमी, पन्हाळा- 0.6, शाहूवाडी- 1.4 मिमी, राधानगरी- 0.7 मिमी, गगनबावडा-5.1 मिमी, करवीर- 0.3 मिमी, कागल- 0.4 मिमी, गडहिंग्लज- निरंक मिमी, भुदरगड- 3.2 मिमी, आजरा-0.3 मिमी, चंदगड- 0.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.