मुरगूड - मुरगूड ता कागल येथील परशराम पांडुरंग लोकरे (वय ५३) या माध्यमिक शिक्षकाने आपल्या प्राध्यापिका पत्नी सविता परशराम लोकरे (वय ४५) यांचा रागाच्या भरात खून केल्याची घटना घडली आहे.उच्चभ्रू वस्तीत कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीचा डोक्यात मुलाच्या सहकार्याने वरवंटा घालून खून केल्याची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ माजली.मुलगी अपूर्वा लोकरे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार परशराम लोकरे व त्यांचा अल्पवयीन मुलगा याना मुरगूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या साई कॉलनी या उच्चभ्रू वस्तीत माध्यमिक शिक्षक परशराम लोकरे हे आपल्या प्राध्यापिका पत्नी सविता लोकरे यांच्यासह एक मुलगा व दोन मुलीसह अपूर्वाई या बंगल्यात राहत होते. सुशिक्षित वातावरण असल्याने सर्वच मुले उच्च शिक्षित आहेत.परशराम आणि त्यांच्या पत्नी सविता यांच्या मध्ये वारंवार कौटुंबिक कारणातून वाद होत होते. आज मंगळवार दिनांक १ रोजी सकाळी घरात चहापान सुरू असताना दोघांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. मुलींनी सदरचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण वाद विकोपाला गेला.
सविता वाद सुरू असताना घराच्या बाजूस असणाऱ्या पत्र्याच्या शेड मध्ये भांडी घासण्यासाठी गेल्या होत्या.त्या ठिकाणी परशराम ही पोहचले त्यावेळी त्यांचा अल्पवयीन मुलगा ही बरोबर होता.त्या मुलाने आपल्या आईचे हात धरले त्यावेळी परशराम यांनी जवळ च असणारा वरवंटा घेऊन पत्नी सविता यांच्या डोक्यात घातला.या वरवंट्याचा घाव वर्मी बसल्याने सविता रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या.
सुरवातीस या घटनेची परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.यातूनच पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी सहा पोलीस निरीक्षक शिवाजी करे हे पोलीस पथकासह पोहचले त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.सांयकाळी उशिरा सविता यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्तात परशराम आणि त्याच्या अल्पवयीन मुलाला नेण्यात आले होते.
अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख जयश्री देसाई यांनी दुपारी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान त्यांच्याच मुलगी अपूर्वा लोकरे (वय २५)हिने आपले वडील परशराम व अल्पवयीन भाऊ याच्या विरोधात मुरगूड पोलिसात तक्रार दिल्याने या दोघांविरोधात पोलिसात गुन्हा नोंद झाला असून, दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान आज शहरात या खुनाला अनुसरून दबक्या आवाजात चर्चेला उत आला होता. सुशिक्षित कुटुंब झाले उद्धवस्थआई वडील उच्च शिक्षित,दोघे ही शिक्षक त्यामुळे अर्थात घरातील वातावरण सुशिक्षित होते त्यामुळेच या दाम्पत्याची मुलगी अपूर्वा ही नुकतीच सेट परीक्षा उत्तीर्ण झाली होती. तर त्यांचा मुलगा ही चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन शासकीय नोकरी साठी प्रयत्न करत होता. तर दुसरी मुलगी आसावरी ही पुणे येथे एमबीए चे शिक्षण घेत आहेत. मुलांच्या यशाबद्दल काही दिवसांपूर्वी आई शिक्षिका सविता यांनी सर्वांना स्नेहभोजन दिले होते. पण सद्या हे कुटुंब आता पोरके झाले आहे.आईचा मृत्यू तर वडील आणि भाऊ पोलिसांच्या ताब्यात त्यामुळे दोन मुली सैरभैर झाल्या आहेत.