शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
2
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
3
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
4
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
5
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
6
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
7
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
8
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
9
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
10
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
12
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
13
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
14
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
15
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
16
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
17
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
18
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
19
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

Kolhapur: हँडेल लॉक तोडून ११ दुचाकी लंपास; दुचाकी चोरतानाच सापडला कर्नाटकातील चोरटा

By उद्धव गोडसे | Published: May 27, 2024 2:23 PM

शाहूपुरी पोलिसांची कारवाई

कोल्हापूर : हँडेल लॉक तोडून दुचाकी लंपास करणारा चोरटा रमेश रवींद्र माने (वय २५, रा. पडलीहाळ, ता. निपाणी, जि. बेळगाव) याला शाहूपुरी पोलिसांनी राजर्षी शाहू मार्केट यार्ड येथून रविवारी (दि. २६) दुपारी अटक केली.माने हा चोरीसाठी दुचाकींची पाहणी करतानाच पोलिसांच्या हाती लागला. कोल्हापूरसह सांगली आणि बेळगाव जिल्ह्यातून गेल्या सहा महिन्यांत ११ दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली असून, चोरीतील सुमारे साडेपाच लाखांच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा कर्नाटकातील दुचाकी चोरटा रमेश माने याचे १२ वी पर्यंत शिक्षण झाले असून, तो तीन वर्षांपूर्वी इचलकरंजीत शहापूर येथे राहत होता. आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी त्याने दुचाकींची चोरी करून त्या कमी किमतीत विकण्याची शक्कल लढवली. त्यानुसार इस्लामपूर (जि. सांगली) एसटी स्टँड, मिरज येथील मिशन हॉस्पिटल, मंगसुळी देवस्थान (जि. बेळगाव), हुक्कीरी, बेळगाव येथील के.एल.ई. हॉस्पिटल, सांगली बस स्टँड येथून दुचाकींची चोरी केली. हँडेल लॉक तोडून बनावट चावीने दुचाकी सुरू करून तो काही क्षणात निघून जायचा. संशयित चोरटा मार्केट यार्ड येथे येणार असल्याची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार विशाल मुळे यांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. ही कारवाई मुळे यांच्यासह गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार संदीप जाधव, कॉन्स्टेबल महेश पाटील, मिलिंद बांगर, शुभम संकपाळ, संदीप बेंद्रे, बाबा ढाकणे, रवी आंबेकर, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

विक्रीसाठी मित्रांकडे दिल्या दुचाकीमाने याने चोरलेल्या दुचाकी विक्रीसाठी सादिक तैवार (रा. शहापूर) आणि ओंकार चोपडे (रा. गोरंबे, ता. कागल) या दोघांकडे दिल्या होत्या. कागदपत्रे नंतर देण्याचे कबूल करून त्याने १० ते १५ हजार रुपयांत एका दुचाकीची विक्री करण्यास मित्रांना सांगितले होते. गाड्यांची विक्री होण्यापूर्वीच तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस