कोल्हापूर : अंबाबाई भक्तांसाठी शाळेच्या दारातच कायमस्वरूपी स्वच्छतागृह उभारले जात आहे. शाळेत येथे २ हजारावर विद्यार्थिनी शिक्षण घेत असून या स्वच्छतागृहामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे या निर्णयाला विरोध करत गुरुवारी प्रिन्सेस इंदुमतीदेवी गर्ल्स हायस्कूलच्या शिक्षिका व पालकांनी स्वच्छतागृहाचे काम बंद पाडले. तसेच जुना राजवाडा पोलीस ठाणे व महापालिका प्रशासनाला याबाबत निवेदन दिले.अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाज्याच्या बाह्य परिसरात पूर्वीच्या प्रांत कार्यालयाला व इंदुमती गर्ल्स हायस्कूलच्या संरक्षक भितींला लागूनच कायमस्वरूपी स्वच्छतागृह उभारले जात आहे. हे स्वच्छतागृह अजिबात स्वच्छ नसतात. या शाळेत बालवाडीपासून ते बारावीपर्यंत २ हजारांवर विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे. स्वच्छतागृहांची दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे विद्यार्थिनी सातत्याने आजारी पडतात. शाळेच्या प्रवेशद्वारातच स्वच्छतागृह उभारणे योग्य नाही, शिवाय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे येथे स्वच्छतागृह नको अशी भूमिका घेत शिक्षिका व पालकांनी स्वच्छतागृहाचे काम बंद पाडले. आपली कैफियत मांडण्यासाठी सर्वजण जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांनादेखील भेटणार आहेत.व्हीआयपींचा प्रवेशअंबाबाईला येणारे सगळे व्हीआयपी दक्षिण दारातून प्रवेश करतात. त्यांची वाहनेदेखील येथेच पार्क केली जातात. हे भाविक मंदिरात जाण्याआधीच हे स्वच्छतागृह दिसते. अनेकदा तर येथील पाणी रस्त्यांवर, शाळेच्या दारात वाहत येते. हा परिसर कधीही स्वच्छ नसतो आता कायमस्वरूपीच हा त्रास राहणार आहे.
अंबाबाई मंदिर परिसरातील शाळेच्या दारातच उभारल जातय स्वच्छतागृह, शिक्षिका व पालकांनी काम पाडले बंद
By इंदुमती सूर्यवंशी | Published: September 08, 2022 7:16 PM