शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आढळला बाराव्या शतकातील यादवकालीन शिलालेख

By संदीप आडनाईक | Published: November 01, 2022 10:02 PM

Ambabai Mandir Kolhapur : करवीर निवासिनी अंबाबाई मंदीरातील भिंतीवरील संगमरवर काढण्याचे काम सुरू असतानाच सरस्वती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर इसवी सनाच्या बाराव्या शतकातील यादवकालीन शिलालेख मंगळवारी आढळला.

- संदीप आडनाईककोल्हापूर  - करवीर निवासिनी अंबाबाई मंदीरातील भिंतीवरील संगमरवर काढण्याचे काम सुरू असतानाच सरस्वती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर इसवी सनाच्या बाराव्या शतकातील यादवकालीन शिलालेख मंगळवारी आढळला. संस्कृत भाषेतील आणि देवनागरी लिपीत असलेला हा शिलालेख २ फुट लांब आणि एक फुट रुंद आहे. गध्देगाळी प्रकारातील आणि दानपत्र स्वरुपाच्या या शिलेलाखांवर १६ ओळी कोरल्या असल्याची माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने करवीर निवासिनी अंबाबाई मंदीर मूळ स्वरुपात यावे, यासाठी सुरु केलेल्या संवर्धन प्रकल्पानुसार मंदीरातील संगमरवरी फरशी काढण्याचे काम सुरू आहे. सरस्वती मंदीर प्रदक्षिणा मार्गावर पूर्वभिंतीत शिलालेख आढळून आला. हा शिलालेख बाराव्या शतकातील असल्याची प्राथमिक माहिती मंदीर सहाय्यक व्यवस्थापक आणि धर्मशास्त्र विभागाचे गणेश नेर्लेकर-देसाई यांनी दिली, यासंदर्भात शिलालेखाचे भाषांतर पूर्ण झाल्यानंतर प्रशासन व्यवस्थापन आणखीन माहिती देणार असून यातून नवीन माहिती उजेडात येण्याची शक्यताही वर्तवली आहे.मुळ मंदीराचा भाग असलेला हा शिलालेख दगडी बांधकामात भिंतीसाठी आडवा दगड म्हणून वापरला गेला असावा. हा लेख शापाशिर्वादात्मक आणि दानपत्र स्वरुपात असण्याचीही शक्यता पडताळून पाहिली जात आहे. यामुळे श्रीकरवीरनिवासीनी अंबाबाई मंदिरातील इतिहासात मौल्यवान भर पडली आहे.-गणेश नेर्लेकर-देसाईधर्मशास्त्र विभाग प्रमुख, अंबाबाई मंदिर कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhistoryइतिहास